विना मास्क फिरणाऱ्या नागरीकांवर कारवाई करण्याचे आदेश

 सांगली - महाराष्ट्रात कोवीड-१९ आजाराचा वाढता प्रादुर्भाव पाहता  जिल्हयात पो अधिक्षक  दिक्षीत गेडाम आणि अपर पोलीस अधिक्षक मनिषा दुबुले  यांनी जिल्हयातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी व सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा ठिकाणी विना मास्क असणाऱ्यांना यांना संपुर्ण जिल्हयात गर्दीच्या ठिकाणी, मॉल, बाजार व इतर गद्दींच्या फिरणारे नागरीकांवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत 

तसेच प्रत्येक पोलीस स्टेशनच्या हद्दीत जास्त जास्तीत कारवाई करण्याबाबत टिम तयार करुन तसेच नाकाबंदी दरम्यान विना मास्क प्रवास करणा-या दुचाकी वाहनावर व पायी 

चालणा-या इसमावरती कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत 

सांगली जिल्हयात एकूण ९३ नागरीक व २ पोलीस अधिकारी व ६ पोलीस अमंलदार यांना होम आयसोलेशन करण्यात आले आहे, त्याचेवर प्रत्येक पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना  पोलीस अधिक्षक   यांनी त्या


चेवर लक्ष  ठेवण्याबाबत सुचना दिल्या आहे, त्याप्रमाणे पोलीस अधिकारी, बीट अमंलदार , बीट मार्शल पेट्रोलिंग हे होम आयसोलेशन असले नागरीकांना घरी असल्याबाबत तपासणी करत आहेत, घरात न मिळाता होम आयसोलेशन असले नागरीक,पोलीस अधिकारी,पोलीस अमंलदार हे जर बाहेर वावरताना मिळुन आलेस त्याच्यावर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ प्रमाणे कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. आयसोलेशन असलेले सर्व नागरीक, पोलीस अधिकारी व अमंलदार यांना बाहेर न पडण्याबाबत आवाहन करण्यात आले आहे. तसेच सर्व नागरीकांनी आवाहन केले आहे की, कावीड-१९ यासारख्या आजारा मात करण्यासाठी मास्क चा वापर करावा, सोशल डिस्टसिंग पाळावे, सॅनिटायझर वापर करावा, वारंवार हात साबणाने स्वच्छ धुवावे, तसेच गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळावे, तसेच विनाकारण बाहेर पडु नये, प्रशासनास सहकार्य करावे, नियमाच पालन करावे,  असे आव्हान पोलीस अधीक्षक यांनी केले आहे