उत्तर प्रदेश मधील महिला अत्याचाराचा सांगलीत निषेध राष्ट्रवादी सांगली जिल्हा शहरच्या वतीने थाळीनाद आंदोलन.

सांगली - 
उत्तर प्रदेश मधील महिला अत्याचार विरोधात राष्ट्रवादी सांगली जिल्हा शहरच्या वतीने थाळीनाद आंदोलन करुन  निषेध व्यक्त करण्यात आला. तसेच या घटनेचा निषेध नोंदवणारी पत्रे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नावे  सांगली पोस्ट आॕफिस मधून स्पीड पोस्टने पाठवण्यात आली. या वेळी विनया पाठक, ज्योती आदाटे, , आदिती कदम, छायाताई जाधव, आशा पाटील, , संध्या आवळे, प्रियंका  तूपलोंढे, सुनिता लालवाणी, पूजा कोलप, जसबिर खंगुरा आदी महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.