महाजन कन्सर्न्स मार्फत वसुंधरा दिन संपन्न : वर्षभरात ५०० बेलाची झाडे लावणार .
महाजन कन्सर्न्स मार्फत वसुंधरा दिन संपन्न : वर्षभरात ५०० बेलाची झाडे लावणार .
   

 शिराळा -  जागतिक वसुंधरा दिना निमित्त येथील महाजन कन्सर्न्स यांच्या वतीने बाजार समितीच्या आवारात बेलाची झाडे लावण्यात आली. दीनदयाळ सहकारी सूत गिरणीचे संचालक सुमंत महाजन यांच्या हस्ते हा कार्यक्रम संपन्न झाला. 
   हिन्दूस्थान पेट्रोलीयम कार्पोशन लि. चे गॅस वितरक महाजन कन्सर्न्स व विवेकानंद सांस्कृतिक, क्रीडा व सेवा मंडळ यांच्या वतीने दरवर्षी असे विविध कार्यक्रम राबवले जातात. हे १७ वे वर्ष आहे. लोकांनी पर्यावरणाची प्रचंड हानी केली आहे त्याचे परिणाम सर्वांना भोगावे लागत आहेत.यासाठी महाजन कन्सर्न्स व विवेकानंदन मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी विवेकानंद वृक्ष संगोपन स्पर्धा, वृक्षारोपण, वृक्षप्रदान कार्यक्रम असे कार्यक्रम राबवत असतात. या दोन्ही संस्था केवळ झाडे लावत नसुन हि झाडे कशी वाढलीत, त्याचे संगोपन व्यवस्थित झाले आहे का? याबाबत लक्ष देत असते.गेली दोन वर्ष करोनाने थैमान घातले आहे तरीही पर्यावरणाचा कार्यक्रम नेहेमीच्या उत्साहात झाला.वसुंधरा दिना निमित्ताने झालेल्या कार्यक्रमात स्वानंद महाजन यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी बोलताना ते म्हणाले की गेली १७ वर्ष अखंडपणे महाजन कन्सर्न्स व विवेकानंद मंडळ पर्यावरणाचे रक्षण व्हावे म्हणून सामाजिक दायित्वाच्या भावनेने काम करत आहे. यावेळी सुमंत महाजन यांच्या हस्ते बेलाचे झाड लावून या वर्षीचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी बोलताना सुमंत महाजन म्हणाले की लोकांच्या वृत्तीमुळे पर्यावरणाची नासाडी झालीआहे.आपण जर वेळीच काळजी घेतली नाही तर भविष्यात घराबाहेर पडताना ॲाक्सिजनचा सिलेंडर सोबत घेऊन फिरावे लागेल  यासाठी प्रत्यकाने आपल्या घराच्या आवारात जास्तीत जास्त देशी झाडे लावावीत. आम्ही विविध शाळांचे विद्यार्थी , आमचे ग्राहकव विविध सामाजिक संघटनांचे कार्यकर्त्यांच्या मदतीने हा जगन्नाथाचा रथ ओढण्याचा प्रयत्न करत आहे. सध्या सर्वत्र करोनाचे थैमान सुरू आहे. 
लोक ॲाक्सिजन अभावी मरत आहेत.ॲाक्सिजन हा हवेतून विघटन करून सिलेंडर मध्ये भरला जातो. पण हवेत हल्ली ॲाक्सिजन पेक्षा अन्य घातक वायु असातात याला आपण सर्वजण कारणीभूत आहेत हे लक्षात ठेवले पाहिजे. यासाठी शुध्द ॲाक्सिजन हवा असेल तर लोकांनी जास्तीत  जास्त देशी झाडे लावली पाहीजेत.या वर्षी ५०० बेलाची झाडे विविध माध्यमातुन लावली जाणार आहेत. ज्यांना घरी झाड लावायचे असेल त्यांनी महाजन गॅस एजन्सी मध्ये संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले. या वेळी मधुकर पाटील, अक्षय पाटील , उदय गायकवाड,पांडूरंग जाधव ,अनिल पाटील, दिनकर गायकवाड, मोरे, राहुल घेवदे उपस्थित होते. नियोजन श्रेयस महाजन यांनी केले.
Attachments area