बिसूर ओढ्याच्या सरंक्षक कठड्याची दुरुस्ती करा


 

बिसूर ओढ्याच्या सरंक्षक कठड्याची दुरुस्ती करा
बिसूर ओढ्याच्या सरंक्षक कठड्याची दुरुस्ती करा

मदनभाऊ युवा मंचचे धरण आंदोलन
 
 सांगली - मिरज तालुक्यातील मौजे बिसूर येथील ओढ्यावर असणार्‍या पुलाच्या संरक्षक कठड्याची दुरुस्ती तात्काळ करा या मागणीसाठी मदनभाऊ पाटील युवा मंचच्यावतीने  मिरजेतील सार्वजनिक बांधकाम विभागापुढे धरणे आंदोलन करण्यात आले.
मौजे बिसूर ता. मिरज येथील ओढ्यावर असलेल्या पुलाला 40 वर्षे पूर्ण झालेली असून माहे ऑक्टोबर 2020 रोजी झालेल्या अवकाळी पावसामुळे आलेल्या महापुरात ओढ्यावरील संरक्षक कठडे तुटलेले आहे. तर काही ठिकाणचे कठडे वाहून गेलेले आहे. सध्या सदर पुलावरून शाळेच्या मुलांची येजा असून वाहनांची सुद्धा खूप वर्दळ असते. सदर पुल वाहतुकीस धोकादायक झालेला आहे. सदर पुलाच्या कामासंदर्भात  नेत्या श्रीमती जयश्रीताई  पाटील व जितेश कदम यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे श्री. रोकडे  यांना माहिती दिली होती. आठ दिवसात काम सुरु करण्याचे आश्‍वासन दिलेले असताना    5 महिने पूर्ण होऊनही काम चालू देखील झालेले नाही.  येत्या आठ दिवसात मौजे बिसूर येथील ओढ्यावरील सरंक्षक रेलिंग चे काम सुरुवात न झाल्यास मिरज तालुक्यातून भीक मागो आंदोलन करून  मदनभाऊ पाटील युवा मंच कार्यकारी अभियंता यांना भीक मागून जमलेले पैसे देण्याचा उपक्रम करणार आहे.
यावेळी मदनभाऊ पाटील युवा मंचाचे जिल्हाध्यक्ष आनंद लेंगरे, माजी सरपंच शहाजी पाटील, माजी उपसरपंच रामचंद्र पाटील,  उपस्थित होते.