नवी मुंबई महानगरपालिकेत यश मिळवण्यासाठी तयार रहा - जयंत पाटील

नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने राष्ट्रवादीची बैठक.


मुंबई दि. १३ - नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये आपण तयारी सुरू केली तर यश आपल्या हातात येणार याबाबत माझ्या मनात शंका नाही. त्यामुळे एकत्रपणे या निवडणुकीत यश मिळवण्यासाठी आपण सर्वच प्रयत्न करू अशी ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या होणाऱ्या निवडणुकीच्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रदेश कार्यालयात आढावा बैठक घेतली.
वादळं येतात आणि जातात आपण सक्षमपणे उभं राहिलं पाहिजे. विधानसभा निवडणुकीत विरोधी पक्षच उरणार नाही असे सांगितले जात होते मात्र आदरणीय शरद पवारसाहेब लढ्यात उतरले आणि महाविकास आघाडीच्या रुपाने महाराष्ट्रात सरकार स्थापन झाले असेही जयंत पाटील यांनी सांगितले. यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेतील मुख्य प्रतोद व नवी मुंबई प्रभारी आमदार शशिकांत शिंदे, प्रदेश सरचिटणीस नसीम सिद्दीकी, ठाण्याचे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, युवक कार्याध्यक्ष सुरज चव्हाण उपस्थित होते.