डॉ. शामाप्रसाद मुखर्जीं यांना जयंतीनिमित्त सांगली भाजपातर्फे अभिवादन.
सांगली - “स्वतंत्र भारतातील पहिल्या सरकार मधील शिक्षणमंत्री, भारतीय जनसंघाचे संस्थापक डॉ. शामाप्रसाद मुखर्जी यांनी या देशाची थोर सेवा केली आहे. आभासात तीक्ष्ण बुद्धीमत्ता असलेने आणि बंगालमधील एका श्रीमंत घराण्यात जन्म घेतलेल्या शामाप्रसादांनी इंग्रज सरकारच्या पदरी नोकरी करायला नकार दिला आणि आपल्या देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झाले. डॉ. मुखाजींची देशसेवा प्रत्येक भारतीयाच्या स्मरणात कायमची राहील.” असे मत आ. सुधीरदादा गाडगीळ यांनी मांडले. डॉ. मुखर्जींच्या जयंतीनिमित्त आ. सुधीरदादा गाडगीळ यांच्या जनसंपर्क कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात आ. गाडगीळांनी आपले मत व्यक्त केले. याप्रसंगी राष्ट्रीय परिषद सदस्य प्रकाशतात्या बिरजे, भाजपा ज्येष्ठ नेते श्रीकांततात्या शिंदे, माजी उपमहापौर धीरज सूर्यवंशी, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष दीपकभाऊ माने, विशाल मोरे, गणपती साळुंखे, गौस पठाण, नगरसेवक गजानन मगदूम, युवा मोर्चा सरचिटणीस चेतन माडगुळकर, युवा मोर्चा सरचिटणीस मकरंद म्हामुलकर विश्वजीत पाटील, गणेश कांबळे, आबासाहेब जाधव यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.