सामाजिक कार्यकर्ते पै.अभिजीत पवार यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा.
सामाजिक कार्यकर्ते पै. अभिजीत  पवार यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा.

 

पिंपरी चिंचवड   -   पुण्याच्या  टायगर ग्रुपचे  पिंपरी चिंचवड शहर कार्याध्यक्ष, लोकप्रिय सामाजिक कार्यकर्ते पै. अभिजीत पवार यांचा वाढ दिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. टायगर ग्रुपचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष पै तानाजी भाऊ जाधव आणि टायगर ग्रुप पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष सिध्दार्थ  गायकवाड यांच्या मार्गदर्शना खाली अनेक उपक्रम राबवण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने सध्याची परिस्थिती आणि गरज लक्षात घेऊन भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात मोठ्या संख्येने सहभागी होत युवक युवती नी रक्तदान केले.

याशिवाय शहरातील  विविध ठिकाणी  5000  गोर गरिबांना *मास्कचे वाटप* करण्यात आले. त्याच प्रमाणे.वाकड पोलीस स्टेशन येथे करोनाशी लडत असलेल्या पोली साना vitiamine c गोळ्याचे वाटप करण्यात आले. तर सांगवी काळेवाडी पोलीस स्टेशन हद्दीतील ट्रॅफिक पोलिसांना कोरोना पासून बचावासाठी "मुख रक्षक"वाटण्यात आले. यानंतर शहरातील विविध ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले. तसेच पिंपरी चिंचवड मधील गरीब आणि निराधारांना "भोजन दान" ही करण्यात  आले.

सामाजिक कार्यकर्ते पै .अभिजीत  पवार यांनी सध्याच्या अतिशय बिकट झालेल्या परिस्थितीत कोणताही डामडौल न करता पैशाची अवाजवी उधळपट्टी न करता अनेकविध सामाजिक उपक्रम राबवून आपला वाढदिवस साजरा केला. 

यावेळी टायगर ग्रुप पिंपरी चिंचवडचे अध्यक्ष सिध्दार्थ  गायकवाड, योगेश मालखरे , डॉ. युवराज किलबिले,  आदी प्रमुख मान्यवरांसह टायगर ग्रुपचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.