हसुरचंपु येथील श्री महालक्ष्मी मंदिरात चोरीची घटना उघडकीस.

हसुरचंपु येथील श्री महालक्ष्मी मंदिरात चोरीची घटना उघडकीस.


 


हसुरचंपु (ता.गडहिंग्लज) - येथील श्री महालक्ष्मी मंदिरात चोरीची घटना उघडकीस आली. देवीच्या 


गळ्यातील दोन सोन्याचे मंगळसूत्र चोरट्याने लांबविले आहे.मंदिरात चोरी झाल्याने गावात खळबळ 


उडाली आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, काल (शनिवार) रात्री मंदिराच्या लोखंडी दाराचे कुलूप 


तोडून चोरट्याने आत प्रवेश केला. देवीच्या गळ्यातील दोन सोन्याचे मंगळसुत्र त्याने लांबविले


त्याची अंदाजे किंमत ४० हजार रुपये आहे. पुजारी दयानंद गुरव यांच्या फिर्यादीवरूनअज्ञात 


चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.