मोटारसायकल आणि मोबाईल चोरणारी सराईत टोळी गजाआड.

 मोटारसायकल आणि मोबाईल चोरणारी सराईत टोळी गजाआड. 



सांगली  - सांगली शहर पोलीस ठाणे हद्दीमध्ये झालेल्या घरफोडी, जबरी चोरी आणि मोटारसायकल चोरी या गुन्हयातील आरोपींचा शोध घेवून कारवाई करणेबाबतचे आदेश मा. पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा साो, मा. अप्पर पोलीस अधीक्षक मनिषा डुबुले मॅडम, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक विरकर सो यांनी दिले होते. त्याप्रमाणे सांगली शहर पो.ठाणेचे पोलीस निरीक्षक श्री अजय सिंदकर यांचे मार्गदर्शनाखाली मोटारसायकल चोरी गुन्हयाचे अनुशंगाने गुन्हे प्रकटीकरण शाख्नेचे कर्मचारी पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलींग करीत असताना संतोष ऊर्फ माया दिलीप कुरणे रा. १०० फुटी रोड सांगली हा विना नंबरप्लेट स्पेल्डर गाडीवरून संशयीतरीत्या फिरताना मिळून आला. त्याचा संशय आल्याने त्याच्याकडे कागदपत्रांबाबत चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्याच्याकडे आणखी चौकशी केली असता त्याने साथीदारांसह दिनांक १०/०५/२०२० रोजी सांगली महानगरपालीका पार्किंग येथून स्पेल्डर मोटारसायकल चोरी केली असल्याची कबुली दिली.


सदरबाबत सांगली शहर पो.ठाणेस गु.र.नं.१६४/२० भा.द.वि.स. कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल आहे. तसेच त्याची अंगझडती घेतली असता अंगझडतीमध्ये दोन मोबाईल मिळून आले त्याबाबत चौकशी केली असता मोबाईल एक महिन्यापूर्वी सांगलीवाडी येथील विटभट्टी वरुन चोरल्याची कबुली दिली. त्याबाबत सांगली शहर पो.ठाणेस गु.र.नं. १९१/२०२० भा.द.वि.स. कलम ३७९,३४ प्रमाणे गुन्हा दाखल असून त्यामध्ये मोबाईल जप्त करण्यात आले. त्याच्याकडे त्याच्या साथीदारांबाबत अधिक चौकशी केली असता त्याचे साथीदार मुस्तफा राजू नदाफ रा. ५० फुटी रोड गादी कारखान्यामागे सांगली आणि सुरज ऊर्फ सुलतान मेहबुब मुल्ला वय. २५ दोन्ही रा. १०० फुटी रोड सांगली यांना ताब्यात घेण्यात आले त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी गुन्हयाची कबुली दिली. तसेच संतोष ऊर्फ माया दिलीप कुरणे व त्याचे साथीदार इम्रान हारूण पठाण रा. १०० फुटी रोड सांगली व असिफ सलीम मुजावर रा. तांबोळी विटभट्टी चोपडेवाडी रस्ता भिलवडी यांच्या मदतीने ५० फुटी रोड रमामातानगर सांगली येथुन हिरो डिलक्स ही मोटारसायकल चोरी केले असल्याबाबत कबुली दिली. सदरबाबत सांगली शहर पो.ठाणेस गु.र.नं. १९/२० भा.द.वि.स. कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल आहे. तसेच चौकशी करीत असताना आणखी एक सांगली शहरातून चोरी केलेली हिरो एच एफ डिलक्स मोटारसायकल सदर आरोपींच्या ताब्यातून जप्त करण्यात आला असून एकूण ५ आरोपींना अटक करण्यात आली 
सदर एकूण आरोपी १) संतोष ऊर्फ माया दिलीप कुरणे वय.२६ वर्षे २) मुस्तफा राजू नदाफ रा. ५० फटी रोड गादी कारखान्यामागे सांगली २) ३) सरज ऊर्फ सलतान मेहबब मल्ला वय. २५ दोन्ही र फुटी रोड सांगली ४) इम्रान हारूण पठाण रा. १०० फुटी रोड सांगली ५) असिफ सलीम मुजावर रा. तांबोळी विटभट्टी चोपडेवाडी रस्ता भिलवडी यांचेकडून एकूण २ मोबाईल आणि ३ मोटारसायकल असा एकूण ८०,००० रू. चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. 
सदर कारवाईमध्ये पोलीस निरीक्षक श्री अजय सिंदकर यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि/निलेश बागाव,सहा.पो.फौ. संजय पवार, पोहेकॉ दिलीप जाधव, पोना इम्रान मुल्ला, पोना गुंडो दोरकर, पोना संदीप पाटील, पोना झाकीर काझी, पोना रमेश पाटील, पोशि धनाजी मोरे, पोशि विकास मोटे, पोशि विक्रम खोत यांनी सहभाग घेतला.