सांगली भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीने रक्तदान शिबिर.
सांगली भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीने  रक्तदान शिबिर.

 


 

सांगली  :-  पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील प्रथम वर्षपूर्तीबद्दल भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीने घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.३०० रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. 

एमएसआय रक्तपेढीने रक्तसंकलन केले.याशिबिराचे उदघाट्न आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्याहस्ते व शहर जिल्हाध्यक्ष दिपकबाबा शिंदे,महापौर सौ.गीताताई सुतार यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.भाजपचे युवामोर्चाचे विधानसभा क्षेत्र अध्यक्ष दीपक माने यांनी आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शहर जिल्हाध्यक्ष दिपकबाबा शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली या रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.यावेळी बोलताना दीपक माने यांनी,'मोदी सरकारने दुसऱ्या कार्यकाळातील पहिले वर्ष अत्यंत यशस्वीपणे पूर्ण केले आहे.सध्या कोरोनाच्या बिकट परिस्थितीत रक्ताची अत्यंत गरज आहे.त्यामुळे रक्तदान करणे हे आपले कर्तव्य समजूनच आम्ही रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे.यावेळी प्रथमेश वैद्य,राहुल माने,अमित भोसले,अनिकेत बेळगावे,शिवराम भोसले,रमेश शिंदे,चेतन माडगूळकर यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.