शिवसेनेने पालकत्व स्विकारलेल्या चिमुकल्या प्रियांशीला तिच्या आई वडिलांकडे केले सुपुर्द.
शिवसेनेने पालकत्व स्विकारलेल्या चिमुकल्या प्रियांशीला  तिच्या आई वडिलांकडे केले सुपुर्द.

 


ठाणे  - ठाणे येथे राहत असलेल्या पुजारी कुटुंबातील सर्वजण कोरोना बाधित झाल्याचे निदर्शनास आले असतानाच त्यांची अकरा महिन्याची कन्या प्रियांशी मात्र सुदैवाने  कोरोना निगेटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले होते. आई, वडील, आजी, आजोबा रुग्णालयात कोरोनाशी झुंज देत असताना, त्यांच्या चिमुरडीचा सांभाळ करण्याची जबाबदारी शिवसैनिक बाळा मुदलियार यांची पत्नी व महिला आघाडीच्या कार्यकर्त्या सौ.रीनाताई मुदलियार यांनी घेतली होती.  ठाणे शिवसेनेच्या वतीने टिप टॉप प्लाझा येथे प्रियांशी व सौ.मुदलियार यांच्या रहाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. प्रियांशीच्या आई वडीलांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली असून आज एकवीस दिवसांनी तिच्या आई वडीलांकडे प्रियांशीला सुखरूपपणे सुपुर्द करण्यात आले. उद्या प्रियांशीचा वाढदिवस आहे, याचे औचित्य साधून ठाणे शिवसेनेच्या वतीने तिचा वाढदिवसाच साजरा करण्यात आला, तसेच तिला तिच्या भावी आयुष्याकरिता शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी प्रियांशीच्या आई वडिलांनी शिवसेनेचे आभार व्यक्त केले.