सांगली पोलीस मुख्यालय येथे आदान प्रदान योजना .

सांगली पोलीस मुख्यालय येथे आदान प्रदान योजना .सांगली - मा. पोलीस अधीक्षक श्री सहेल शर्मा व अपर पोलीस अधिक्षक मनिषा दुबुले, यांनी सांगली जिल्हयातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी यांना आपले -आपले उपविभागीतील सर्व पोलीस ठाणे कडील रेकॉर्ड वरील मालमत्तेविरुध्दचे दाखल गुन्हे, असलेले आरोपीना उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय मध्ये हजर ठेवून त्याच्या हालचाली बाबत लक्ष देता येईल या करीता आदान प्रदान योजना राबवण्यात आली , सांगली मिरज विभागातील आदान प्रदान ही योजना पोलीस मुख्यालय येथे घेण्यात आली. 
सांगली मिरज विभागातील आदान प्रदान या करीता अपर पोलीस अधिक्षक मनिषा दुबुले व मिरज विभागातील उपविभागीय अधिकारी श्री संदीपसिंग गिल , व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा प्रभारी अधिकारी श्रीकांत पिंगळे, विभागातील १० पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी , डीबी पथकातील गुन्हे प्रकटीकरण करणारे २१ कर्मचारी, व मालमत्तेविरुध्दचे दाखल गुन्हे असलेले असे एकुन ३० आरोपी याचे उपस्थित आदान प्रदान कार्यक्रम पार पडला. 
तासगाव, विटा विभागातील या करीता उपविभागीय अधिकारी श्री अंकुश इंगळे , विभागातील ०७ पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी, गुन्हे प्रकटीकरण करणारे ११ कर्मचारी, व मालमत्तेविरुध्दचे दाखल गुन्हे असलेले असे एकुन २६ आरोपी याचे उपस्थित आदान प्रदान कार्यक्रम 
पार पडला. जत विभागातील उपविभागीय अधिकारी श्री दिलीप जगदाळे , अधिकारी ०४ , डीवी पथकातील गुन्हे प्रकटीकरण करणारे ०७ कर्मचारी, व मालमत्तेविरुध्दचे दाखल गुन्हे असलेले असे एकुन १७ आरोपी याचे उपस्थित आदान प्रदान कार्यक्रम पार पडला.  इस्लामपुर विभागातील उपविभागीय अधिकारी श्री कृष्णात पिंगळे , ०८ अधिकारी , गुन्हे प्रकटीकरण करणारे ११ कर्मचारी, व मालमत्तेविरुध्दचे दाखल गुन्हे असलेले असे एकुन ३४ आरोपी याचे उपस्थित आदान प्रदान कार्यक्रम पार पडला. सदर आरोपी आदान प्रदान योजने दरम्यान सांगली जिल्हयातील २९ अधिकारी, ५० पोलीस कर्मचारी हजर होते. यापुर्वीच्या मालमत्तेविरुध्दचे दाखल असलेले गुन्हयातील असे एकुन १०७ आरोपी याचे उपस्थित आदान प्रदान कार्यक्रम पार पडला. असून त्यांचेवर योग्य त्या प्रतिबंधात्माक कारवाई करुन, त्यांचे हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे.