स्थानिक गुन्हे अन्वेषण च्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकाची स्थापना.

स्थानिक गुन्हे अन्वेषण  च्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकाची स्थापना.



सांगली - पोलीस अधिक्षक सुहेल शर्मा यांनी आज रोजी खंडणी विरोधी पथकाची स्थापना केली. या पथकामध्ये एक पोलीस अधिकारी व पाच पोलीस कर्मचारी यांची नियुक्ती केली असुन हे पथक पोलीस निरीक्षक श्रीकांत पिंगळे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा,सांगली याचे
मार्गदर्शनाखाली काम पाहणार आहे. सांगली जिल्हयामध्ये विशेषत, सांगली मिरज शहरामध्ये वैद्यकीय क्षेत्रात काम पाहणारे उच्च विद्याविभुषीत असणारे डॉक्टर्स हे व्यवसाय करीत आहेत. त्यामुळे मिरजेला मेडीकल हब म्हणुन ओळख प्राप्त झालेली आहे. असे असतानाही काही गुंड प्रवृत्तीचे लोक वैद्यकिय क्षेत्रात काम करणा-या डॉक्टरांना खंडणी मागत असल्याची प्रकरणे समोर आल्याने पोलीस अधिक्षक सुहेल शर्मा सो यांनी इंडीयन मेडीकल असोसिएशन यांचेशी चर्चा करुन आजच त्वरीत प्रभावाने खंडणी विरोधी पथक स्थापन करण्याचे आदेश पारीत केले आहेत. सदरचे पथक मेडीकल असोसिएशन बरोबरच इतर क्षेत्रात (व्यापारी संघटना, हॉटेल व्यवसायिक,सराफ असोसिएशन, बिल्डर असोसिएशन व उद्योगपती ) हि काम करणा-या लोकांना मदत करणार  आहेत. सदरचे पथक हे मेडीकल असोसिएशन व इतर असोसिएशनना स्वतः  भेटी  देऊन त्यांचेशी वैयक्तीक रित्या संपर्क साधुन त्यांना कोण गुंड प्रवृत्तीचे इसम खंडणी मागतात किंवा इतर प्रकारे त्रास देतात याची विचारपुस करुन त्या संबंधीत गुंड प्रवृत्तीच्या इसमावर ठोस व परीणामकारक कारवाई करणार आहे. सदर पथकाचे कार्यक्षेत्र हे पुर्ण सांगली जिल्हयासाठी असुन सांगली जिल्हयातील  खंडणी संबधीची प्रकरणे या पथकाकडुन तपासली जाणार आहेत. त्याचप्रमाणे खंडणी मागणारे गुंड प्रवृत्तीच्या इसमांची गोपनिय माहीती एकत्रित करुन त्यांचेवर प्रतिबंधात्मक कारवाई सुध्दा या पथकामार्फत केली जाणार आहे. सांगली जिल्हयातील सर्व प्रतिष्ठीत डॉक्टर, व्यापारी,बिल्डर, उद्योगपती यांना, ज्या कोणाला गुंड प्रवृत्तीच्या इसमांकडुन त्रास होत असल्यास त्यांनी तात्काळ खंडणी विरोधी पथक  (स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सांगली)  यांना दुरध्वनी क्रमांक ०२३३-२६७२८५० या नंबरवर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.