महापालिकेच्या ताफ्यात दोन नव्या दोन बोटी दाखल : आमदार ,आयुक्त, महापौरांच्या हस्ते बोटीचे पूजन
सांगली : सांगली महापालिकेच्या आपत्ती नियंत्रण सेवेच्या ताफ्यात आज दोन नव्या यांत्रिक बोटी दाखल झाल्या आहेत. या दोन नव्या बोटीचे पूजन आमदार सुधीरदादा गाडगीळ, महापौर गीताताई सुतार आणि मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांच्याहस्ते स्वामी समर्थ घाटावर करण्यात आले.
संभाव्य महापूर आपत्तीच्या पार्श्वभूमीवर मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांनी यांत्रिक बोटी घेण्याचे आदेश अग्निशामक विभागाला दिले होते. यानुसार आज नव्या दोन बोटी मनपाच्या ताफ्यात दाखल झाल्या आहेत. सांगली वाडी येथील जमादार फर्मकडून या बोटी तयार करण्यात आल्या असून यामध्ये 12 प्रवासी बसतील इतकी क्षमता आहे. आज या स्वामी समर्थ घाटावर बोटीचे पूजन करून त्याचे नदी पात्रात प्रात्यक्षिक घेण्यात आले. यावेळी आमदार सुधीरदादा गाडगीळ, महापौर गीताताई सुतार, आणि मनपा आयुक्त नितीन कापडणीस , स्थायी सभापती संदीप आवटी, गटनेते युवराज बावडेकर, उपायुक्त स्मृती पाटील, प्रभाग सभापती उर्मिला बेलवलकर, महिला बालकल्याण सभापती नसीमा नाईक, नगरसेवक धीरज सूर्यवंशी, सुबराव मद्रासी, राजेंद्र कुंभार, नगरसेविका अप्सरा वायदंडे आदींनी बोटीतून फेरफटका मारत माहिती घेतली. यावेळी मुख्य अग्निशामक अधिकारी चिंतामणी कांबळे, सब फायर ऑफिसर विजय पवार आदींनी बोटीबाबतची माहिती सर्वाना करून दिली. यावेळी मनपा आयुक्त नितीन कापडणीस आणि महापौर गीताताई सुतार यांनी या नव्या बोटीबाबत समाधान व्यक्त करत आपली मनपा यंत्रणा येणाऱ्या आपत्तीला तोंड देण्यासाठी सज्ज असल्याचे सांगितले.