निकृष्ठ दर्जाच्या डांबरीकरण रस्त्याची चौकशी करा.

निकृष्ठ दर्जाच्या डांबरीकरण  रस्त्याची चौकशी करा.
सांगली - आमदार सुधीर दादा गाडगीळ यांच्या प्रयत्नातून सांगली शहरातील जुना बुधगाव रोड प्रभाग क्रमांक 12 मधील संभाजी कॉलनी येथील  डांबरीकरण रस्त्याचे काम चालू आहे. सदरील रस्ता हा दिनांक 23 जून 20 रोजी पूर्ण झालेला आहे . तसेच सदरचा परिसर हा पूर्ण पट्ट्यातील आहे. पावसाळ्यामध्ये या भागांमध्ये रस्त्याचे काम केलेले आहे , त्यामुळे रस्त्याचे डांबरीकरण व खडीकरण हे आत्ताच इतके कुमकुवत असल्याने हाताने सुद्धा निघत आहे, हा रस्ता पूर्णता बोगस व घाईगडबडीत केला गेला आहे . संभाजी कॉलनी येथील रस्ता वीस ते तीस वर्षानंतर होत असून यामध्ये निकृष्ट दर्जाचे काम झालेले आहे, या कामासंदर्भात  स्थानिक नागरिकां मधून खूप नाराजी असून तक्रारी होत आहे, बेकायदेशीर कामे करून व निकृष्ट दर्जाचे कामे करून ठेकेदार गडगंज होत आहे, असा सवाल तेथील नागरिकांनी केलेला आहे या कामाची सखोल चौकशी करून ठेकेदारास यापुढे कोणतेही काम मिळू नये अशी मागणी शिवसेना सांगली शहर प्रमुख मयुर घोडके यांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांच्याकडे केली आहे.