उडान फौंडेशनने केला कोरोना योध्यांचा सन्मान.   उडान फौंडेशनने केला कोरोना योध्यांचा सन्मान.

 

           


कोल्हापूर - उडान फौंडेशनने दिलेल्या प्रोत्साहनामुळे कोरोना विरुद्ध लढण्याची प्रेरणा मिळाली यामुळेच आपला कागल तालुका लवकरच कोरोनामुक्त होईल असे प्रतिपादन कागल तालुका आरोग्य अधिकारी डॉ. श्रेयस जुवेकर यांनी केले. उडान फौंडेशनकडून आयोजित कोरोना योध्यांच्या सन्मान सोहळ्यात ते बोलत होते. अध्यक्ष स्थानी कागल तालुका गटविकास अधिकारी श्री. शबाना मोकाशी होत्या. कोरोना या संसर्गजन्य रोगामुळे संपूर्ण जग आज थांबलेले पाहायला मिळत आहे. या जीवघेण्या व्हायरस मुळे अक्षरशः संपूर्ण जगात हाहाकार माजलाय. जगाच्या पाठीवर महासत्ता म्हणून मिरवणाऱ्या देशांनी सुद्धा या आजारासमोर हात टेकले आहेत.

इतर प्रगत देशांच्या तुलनेत आपल्या देशात परिस्थिती नियंत्रणात आहे. प्रशासन, पोलिस, डॉक्टर्स, मेडिकल स्टाफ,आशा सेविका, स्वच्छता कर्मचारी, पत्रकार  हे देवदूत आपल्या देशाला या संकटातून वाचवन्यासाठी अहोरात्र झटत आहेत. या सर्व देवदूतांचे आपल्यावर खुप मोठे ऋण आहेत. यांच्या ऋणातून आपण कधीच मुक्त होऊ शकणार नाही. याच कोरोना योध्यांचा "ऋणपत्र" देऊन सन्मान करण्याचे उडान फौंडेशन या संस्थेने ठरवले. त्यानुसार आज कागल पोलिस ठाणे, कोगनोळी टोल नाक्यावरील कर्नाटक पोलिस, महाराष्ट्र राज्य सीमेवरील महाराष्ट्र पोलिस, ग्रामीण रुग्णालयातील सर्व कर्मचारी, पंचायत समिती मधील आरोग्य विभाग, आशा सेविका, पत्रकार बंधू यांचा ऋणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.

या कार्यक्रमासाठी कागल पोलिस निरीक्षक श्री. दत्तात्रय गणपती नाळे, कागल पंचायत समिती गटविकास अधिकारी श्री. डॉ. शबाना मोकाशी, आरोग्य अधिकारी श्री. डॉ. श्रेयस जुवेकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. या मान्यवरांच्या हस्ते सर्व योध्यांना ऋणपत्र देण्यात आले. या कार्यक्रमासाठी संस्थापक अध्यक्ष भुषण लाड, सुनिता नरदगे, हिंदुराव पाटील, प्रताप लाड, सुजित खामकर, आनंदा कुंभार सर, समीर कांबळे, पुरंदर कांबळे, प्रणित कांबळे, दिपक सडोलकर, अजित हातकर, मंगेश कांबळे, साताप्पा पाटील हे सदस्य उपस्थित होते.