काॅंग्रेस नेते राहूल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त वार्ड क्रमांक 15 मध्ये रक्तदान शिबिर पार पडले.
काॅंग्रेस नेते राहूल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त वार्ड क्रमांक 15 मध्ये रक्तदान शिबिर पार पडले.

  

सांगली - कॉंग्रेस पक्षाचे सरचिटणीस राहुल गांधी यांच्या वाढदिवसनिमित्त वार्ड क्रमांक 15 मध्ये सांगली जिल्हा युवक काँग्रेस  च्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. 

सध्या सुरू असलेले कोरोनाचे थैमान आणि त्या पार्श्वभूमीवर रक्ताचा पडत असलेला तुटवडा याचा विचार करून हे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आल्याची माहिती युवक कॉंग्रेसचे महापालिका क्षेत्र अध्यक्ष अजित दुधाळ यांनी दिली.

यावेळी युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष, नगरसेवक  मंगेश चव्हाण, एन एस यू आयचे जिल्हाध्यक्ष सौरभ पाटील, विधानसभा क्षेत्र अध्यक्ष योगेश राणे, उत्कर्ष खाडे, अशीष चौधरी, मंदार चौगुले, तजुद्दिन शेख, संग्राम चव्हाण, सोहेल बलबंड आदी उपस्थित होते.