उघड्या गटारीत पडलेल्या म्हशीची अग्निशामक आणि अनिमल राहतने केली सुटका.





उघड्या गटारीत पडलेल्या म्हशीची अग्निशामक  आणि अनिमल राहतने केली सुटका.

 

        सांगली -  सांगलीच्या शंभर फुटी रोडवरील भोबे गटारीत गर्भवती म्हैस पडल्याची माहिती समजताच य महापालिका अग्निशामक विभाग आणि अनिमल राहतने धाव घेत अथक प्रयत्न करून या म्हशीला बाहेर काढले. अनिल दानके यांची ही म्हैस गटारीकडेचे गवत चरत असताना उघड्या गटारीत पडली. यावेळी तेथील काही नागरिकांनी ही घटना लगेच सांगली अग्निशमन विभागाला कळवली. यानंतर मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली अग्निशामक अधिकारी चिंतामणी कांबळे हे आपल्या अग्निशमन जवानासह  घटना घडलेल्या ठिकाणी दाखल झाले. यावेळी मनपा कर्मचाऱ्यांनी म्हशीलावर घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले पण ती म्हैस गर्भवती असल्याने अग्निशमन विभागाला अडचन निर्माण होत होती. यावेळी अनिमल राहतच्या कोस्तुभ पोळ यांना घटना कळवली लागलीच अनिमल राहतला कळवले. यावेळी सर्व रेस्क्यू टीमसुद्धा घटनास्थळी बचाव साहित्यासहित दाखल झाली. यावेळी क्रेनचीच्या साहाय्याने म्हैस गर्भवती असल्याने तिला कोणती ही इजा न करता अग्निशामक विभाग आणि अनिमल राहत यांच्या टीमने सुखरूप बाहेर काढले. याचे नागरिकांनी कौतुक केले.