अंजली फौंडेशन मार्फत सिव्हील हॉस्पिटलला व्हेंटीलेटर प्रदान.

आ.सुधीरदादा गाडगीळ यांच्या अंजली फौंडेशन मार्फत सिव्हील हॉस्पिटलला व्हेंटीलेटर प्रदान.



सांगली - गोरगरीब, गरजू रुग्णांच्यावर उपचार करण्यासाठी आवश्यक ती सर्व मदत शासकिय रुग्पालयाला करु अशी ग्वाही आमदार सुधीर गाडगीळ यांनी आज येथे बोलताना दिली. आमदार गाडगीळ यांच्या प्रयत्नातून तीन व्हेंटिलेटर्स सिव्हीलचे अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. यावेळी अंजली फौंडेशनचे ट्रस्टी सिद्धार्ध गाडगीळ, महापौर सौ. गीता सुतार, प्रदेश उपाध्यक्ष शेखर इनामदार, माजी उपमहापौर धीरज सुर्यवंशी महिला व बालकल्याण सभापती सौ. नसीमा नाईक व प्रभाग क्र. १ च्या सभापती सौ. उर्मिला बेलवलकर, सरचिटणीस शरद नलवडे, गणपतराव साळुंखे, अतुल माने, मकरंद म्हामुलकर, आदी उपस्थित होते.


गाडगीळ म्हणाले, शासकिय रुग्णालयात केवळ सांगली जिल्हाच नव्हे तर कर्नाटक तसेच जयसिंगपूर, शिरोळ, इचलकरंजी या परिसरातून अनेक गोरगरीब रुग्ण उपचारासाठी येत असतात. त्यांच्यावर योग्य आणि तातडीने उपचार व्हावेत यासाठी सिव्हील हॉस्पिटलला आवश्यक ती सर्व मदत करणार आहे. ते म्हणाले, अंजली फौंडेशन, महाबळ मेटल प्रायव्हेट लिमीटेड, सांगली व जीवनज्योत कॅन्सर रिलीफ ट्रस्ट मुंबईच्या माध्यमातून तीन व्हेंटिलेटर्स शासकिय रुग्णालयाला दिली आहेत. आमदार फंडातूनही आणखी तीन व्हेंटिलेटर्स देणार आहे. याचा रुग्णांना चांगला फायदा होईल.


अधिष्ठाता नणंदकर म्हणाले, आ.गाडगीळ यांनी योग्य वेळी मदत केली आहे. सिव्हील कडील नऊ व्हेंटिलेटर्स बंद होते. ते दुरुस्त करुन घेण्याचे काम सुरु आहे. आता उपलब्ध सहा आणि आमदार गाडगीळ यांच्या प्रयत्नातून मिळालेल्या तीन अशा नऊ व्हेंटिलेटर्स चांगला फायदा होणार आहे. रुग्णांना व्हेंटिलेटर्स अभावी उपचाराची वाट पहावी लागणार नाही. मा. आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी दिलेल्या या उपकरणांचा उपयोग कोव्हिड-१९ चे संशयित/बाधित रुग्ण तसेच सांगली जिल्ह्यातील गोरगरीब सर्वसाधारण आजाराचे रुग्ण यांना अतिदक्षता विभागामध्ये अत्यावश्यक उपचारासाठी मोठ्या प्रमाणात उपयोग होणार आहे असे त्यांनी सांगितले.


दरम्यान आ. गाडगीळ यांनी आयसीयु कक्षाची पाहणी केली. यावेळी उपअधिष्ठाता डॉ. प्रकाश गुरव, वैद्यकिय अधिक्षक डॉ. उमेश भोई, उपवैद्यकीय अधिक्षक डॉ. संतोष दळवी, , प्रशासकिय अधिकारी मनोज दाभाडे, आदिसेविका श्रीमती सीमा चव्हाण तसेच प्राध्यापक व विभाग प्रमुख, निवासी डॉक्टर्स, अधिकारी, परिचर्या संवर्ग व कर्मचारी, आदी उपस्थित होते.