आकार फाउंडेशन मार्फत जीवनावश्यक वस्तूचे किट वाटप.

आकार फाउंडेशन मार्फत जीवनावश्यक वस्तूचे किट वाटप.


सांगली - कोरोना च्या पार्श्वभूमी मुळे सर्वत्र बंद आहे. हातावरचे पोट असणाऱ्या कुटुंबांना फार अडचणीतून जावे लागत आहे. मात्र समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो. हा  उद्देश ठेवून आज राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षांकडून आकार फांऊन्डेशन मधील एकपालकत्व असलेल्या कुटुंबियांना जीवनावश्यक वस्तुंचे  कीट वाटप करण्यात आले. जीवनावश्यक वस्तू चे किट शहर जिल्हा अध्यक्ष संजय बजाज यांचे हस्ते देण्यात आले .यावेळी ओबीसी  शहर अध्यक्ष संजय औधकर ,माजी नगरसेवक आयुब बारगीर, जिल्हा शहर उपाध्यक्षा ज्योती आदाटे, सरचिटणीस महिला आघाडी ची प्रियांका तुपलोंडे, तसेच आकार फांऊन्डेशन च्या उपाध्यक्षा उज्वलाताई  परांजपे आणि सुप्रिया वाटवे  उपस्थित होते.