भिलवडी येथे बेकायदेशीररित्या दारू बाळगल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल.


 भिलवडी येथे बेकायदेशीररित्या दारू बाळगल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल. 
भिलवडी - भिलवडी येथे बेकायदेशीर बिगर परवाना देशी दारूच्या ४८ बाटल्या जवळ बाळगल्या प्रकरणी दोघांविरूध्द भिलवडी पोलीस ठाणेत गुन्हा नोंद झाला आहे


 भिलवडी ता. पलूस येथे मुख्य बाजारपेठेमध्ये इंदीरा बेकरी नावाचे प्रसिध्द असे मिठाई दुकान आहे. सध्या कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर भिलवडी येथील सर्व व्यवहार दुपारी १२ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याच्या सुचना स्थानिक आपत्ती व्यवस्थापना कडून देण्यात आल्या असून, त्यानुसार भिलवडी येथील सर्व व्यवहार सुरळीत सुरू आहेत परंतु फक्त इंदीरा बेकरीचे दरवाजेच उशीरापर्यंत सुरु राहत होते. आज दि. १o मे रोजीही दुपारी १.३० वाजेपर्यंत त्याचे मिठाई दुकान सुरूच होते. त्यावेळी इंदीरा बेकरी जवळ मेन रोडकडेला बेकरीसमोरील मोकळ्या जागेत प्रदीप गोपाल परमबेन वय वर्षे ४९ रा. भिलवडी ता. पलूस व सनिश जोसफ कळपडीकल वय वर्षे ३५ सध्या राहणार भिलवडी ता.पलूस मुळगाव नुचीयाड जिल्हा कन्नूर, केरळ यांनी बेकायदा बिगर परवाना देशी दारू टँगो पंच कंपनीच्या, कंपनीचे सिलबंद असलेल्या दोन हजार चारशे शहाण्णव रुपये किंमतीच्या, १८० मि.ली.च्या ४८ बाटल्या कब्जात बाळगल्याचे मिळून आल्याची फिर्याद पोलीस किरण खंडागळे यांनी भिलवडी पोलीस ठाण्यामध्ये दिली आहे. सदर फिर्यादीवरून दोघांवर गुन्हा दाखल झाला असून, सदर गुन्ह्याचा अधिक तपास भिलवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षक कैलास कोडग यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस फौजदार तानाजी शिंदे हे करीत आहेत. दरम्यान भिलवडी येथे मुख्य बाजारपेठेमध्ये बेकरी व्यावसायिका जवळ बेकायदेशीर बिगर परवाना देशी दारूच्या ४८ बाटल्या मिळून आल्यामुळे गावामध्ये उलटसुलट चर्चा सुरू आहेत.