स्वॅबचा अहवाल तत्काळ मिळावा, सिव्हीलमध्ये सीसीटीव्ही बसवा : आ. सुभाष देशमुख.






  • स्वॅबचा अहवाल तत्काळ मिळावा, सिव्हीलमध्ये सीसीटीव्ही बसवा.

  • आ. सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकार्‍यांना दिल्या सूचना.


सोलापूर : कोराना संशयित रूग्णाची स्वॅब स्टेस्ट लवकर घेऊन त्याचा  अहवाल तत्काळ मिळण्याची सोय करावी, खासगी दवाखान्यात जर कोरानाग्रस्त रूग्ण आढळला तर लगेच दवाखाना सिल करू नये, सिव्हील प्रशासनाबद्दल अनेकांच्या तक्रारी येत आहेत, त्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरा सिव्हीलमध्ये बसवावेत, स्वत धान्य दुकानातून रेशनची व्यवस्था सुरळीत करावी, यासह विविध सूचना माजी सहकार मंत्री तथा आ. सुभाष देशमुख यांनी जिल्हाधिकार्‍यांना केल्या. 

 

आ. देशमुख यांनी गुरूवारी जिल्हाधिकार्‍यांची भेट घेऊन कोरानाबाबतचा आढावा घेतला.  यावेळी आ. देशमुख  यांनी सोलापूर शहर आणि जिल्ह्यात कोराना रूग्ण वाढत आहेत. स्वॅब स्टेट करून त्याचा अहवाल येण्यास तीन ते चार दिवस लागतात. त्यामुळे रूग्णांची हेळसांड होत आहे. त्यामुळे स्वॅब स्टेट लवकर घेऊन त्याचा अहवाल तत्काळ मिळण्याची सोय करावी, खाजगी दवाखान्यात रूग्ण सापडल्यास दवाखाना सिल ना करता योग्यपणे काळजी घ्यावी व तेथील डॉक्टर याना विश्वासात घेऊन काम करावे, सिव्हीलमधील डॉक्टर, नर्स, ब्रदर व्यवस्थित काम करतात की नाही हे पाहण्यासाठी विविध ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, आशा वर्कर स्वतःचा जीव धोक्यात घालून काम करत आहेत, त्यांचे चार महिन्याचे वेतन थकले आहे ते त्वरित मिळावे,  रेशन धान्य दुकानातून अजूनही सुरळीत धान्य पुरवठा होत नाही, अशा तक्रारी आहेत. जिल्हाधिकार्‍यांनी यात लक्ष घालून लोकांना धान्य व्यवस्था सुरळीत करण्याचे आदेश द्यावेत, प्रत्येक वॉर्डात नागरिकांची आरोग्य तपासणी करण्याची सोय करावी, रेल्वे ग्राऊंडवर कोव्हीड रूग्णालय करण्यासाठी विचार करावा, भीमा नदीला पाणी सोडले आहे मात्र दक्षिण तालुक्यात दोनच तास वीज सोडल्याने त्याचा उपयोग नाही, त्यासाठी चार तास वीज पुरवठा करावा, कोरानामुळे मृत्यू झालेल्या घरातील कुटुंबियांना क्वारंनटाईन केले जात आहे, त्यांच्याही अनेक तक्रारी आहेत, त्या सोडवाव्यात आदी सूचना जिल्हाधिकार्‍यांकडे केल्या.