सफाई कर्मचारी कुटुंबाला धान्यकीट देण्यात आले.
सफाई कर्मचारी कुटुंबाला धान्यकीट देण्यात आले.

 

मिरज -   तीन महिण्यापूर्वी प्रशांत ढाले , उत्तम पांढरे यांचा सेवेत असताना मृत्य झाला , त्यांच्या कुटूंबाला आर्थिक मदत मिळावी यासाठी संघर्ष सफाई कर्मचारी संघटना पाठपुरावा करत आहे,यासाठी आयुक्तांनी ही सकारत्मक प्रयत्न केले आहेत,अद्याप या कुटुंबातील सदस्यांला नोकरीत रुजू करण्याची प्रक्रिया सुरू आहे,या लांबलेल्या कालावधीमुळे कुटूंबाची आर्थिक परिस्थिती खालावली आहे,या लॉकडाऊन काळात त्यांना मदतीची गरज असताना आज संघर्ष सफाई कर्मचारी संघटनेच्या वतीने या कुटूंबाच्या घरी जाऊन आय पी एस गील यांच्या हस्ते या कुटूंबाला दैनंदिन अन्न धान्य म्हणून महिना भर पुरेल इतके धान्य कीट  देण्यात आले .

यावेळी पोलीस निरीक्षक राजू ताशीलदार, वाहतूक पोलीस निरीक्षक संजय शिरसागर,यांच्याहस्ते ही कीट वाटप करण्यात आले,यावेळी संघटनेचे अध्यक्ष डॉ महेशकुमार कांबळे व शरद सातपुते उपस्थित होते