आ. सुधीर गाडगीळ यांची मिरज शासकीय रुग्णालय ( कोरोना हॉस्पिटल) भेट.

आ. सुधीर गाडगीळ यांची मिरज शासकीय रुग्णालय ( कोरोना हॉस्पिटल) भेट.


स्थानिक विकास निधीतून  सांगली सिव्हील हॉस्पिटलसाठी ३ व्हेंटीलेटर्स दिले.


सांगली -  
कोरोनाशी लढाई सुरु असताना लॉक डाऊनच्या पहिल्या टप्प्यापासून आजअखेर सांगलीचे कर्तव्यदक्ष भाजप आमदार सुधीर गाडगीळ अखंडपणे रस्त्यावर आहेत. अन्य बहुतांशी बडी नेतेमंडळी स्वतःच्या जीवाला जपण्यासाठी घरी बसून असताना जीव धोक्यात घालून आ. सुधीर गाडगीळ सक्रिय आहेत हे विशेष. मिरजेतील शासकीय रुग्णालय ( कोरोना हॉस्पिटल) येथे  आ. सुधीर गाडगीळ यांनी भेट देऊन अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर यांच्याशी चर्चा केली. यावेळी त्यांनी कोरोना संदर्भातील सर्व तपशीलवार माहिती जाणून घेतली, आकडेवारी घेतली तसेच रुग्णालयाच्या अडचणी समजून घेतल्या. यावेळी भाजप शहर जिल्हाध्यक्ष दिपकबाबा शिंदे, भाजप जिल्हा सरचिटणीस मोहन वाटवे, डॉ रुपेश  शिंदे, गणपत साळुंखे, यांच्यासह रुग्णालयातील अन्य वरिष्ठ डॉक्टर्स उपस्थित होते. तसेच मिरज हॉस्पिटलला जाण्या पूर्वी सांगली सिव्हील हॉस्पिटल येथे भाजपा व आमदार सुधीर दादा गाडगीळ युवा मंच वतीने पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय, सांगली ( सांगली सिव्हिल हॉस्पिटल ) येथे सुरू असलेल्या  विविध कामाचा आढावा बैठक घेण्यात आली व यावेळी हॉस्पिटल मधील डॉक्टर, नर्सेस व आरोग्य कर्मचारी व विशेष सुरक्षा बलचे कर्मचारी यांना सॅनिटाझर, मास्क व कोव्हीड -१९ कोरोना व्हायरस प्रादुर्भाव रोखणेसाठी करावयाच्या उपाययोजनां बाबतचे माहिती पत्रक किटचे वाटप करण्यात आले यावेळी भाजपा उपाध्यक्ष शेखर इनामदार, महापौर गीताताई सुयोग सुतार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ संजय साळूंखे, उपअधिष्ठाता डॉ प्रकाश गुरव, वैद्यकीय अधीक्षक डॉ. उमेश भोई उपवैद्यकीय अधीक्षक डॉ. दळवी, संजय खाडे, मेट्रनर सीमा चव्हाण, शाखा अभियंता मुजावर तसेच आमदार सुधीरदादा गाडगीळ युवा मंच व भाजपचे दीपक माने, विश्वजीत पाटील, मकरंद महामुलकार, गणपती साळुंखे आदी पदाधिकारी डॉक्टर्स व स्टाफ उपस्थित होते.