कर्नाळ येथील एक जण करूना बाधित. जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी 

कर्नाळ येथील एक जण करूना बाधित.


जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी


सांगली-
मिरज तालुक्यातील कर्नाळ येथील एक जण सातारा येथे आजोळी आजी वारल्याने गेले होते. त्या ठिकाणी त्यांचे मावसभाऊ मुंबईहून आले होते. त्या घरात सातारा येथील एक व्यक्ती कोरोणा बाधित झाल्याचे सातारा येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगली जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांना कळविल्याने कर्नाळ येथील सदर व्यक्तीला काल दिनांक २ मे रोजी मिरज सिव्हिल येथील आयसोलेशन कक्षात खबरदारी म्हणून ऍडमिट करण्यात आले. सदर व्यक्तीला कोणतीही लक्षणे नव्हती. तरी या व्यक्तीची कोरोणा चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. या व्यक्तीची प्रकृती स्थिर आहे. या व्यक्तीचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग चालू झाले असून त्या ठीकाणी आणि वैद्यकीय पथक पोहोचले आहे‌.अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ अभिजित चौधरी यांनी दिली आहे. सांगली जिल्ह्यात सध्या उपचारा खालील रुग्णांची संख्या ७ झाली आहे.