आ.सुधीर गाडगीळ यांच्या  निधीतून  स्वामी समर्थ कॉलनीतील रस्ता डांबरीकरण.

  • आ.सुधीर गाडगीळ यांच्या  निधीतून  स्वामी समर्थ कॉलनीतील रस्ता डांबरीकरण.




सांगली -  गेल्या महिना भरापासून प्रतिष्ठेचा विषय बनलेल्या जुना कुपवाड रोडवरील स्वामी समर्थ कॉलनीतील रस्ता अखेर डांबरी झाला आहे. त्यामुळे आता समर्थ कॉलनीतील नागरिकांचा पावसाळा सुसह्य जाणार आहे. 

    स्थानिक नगरसेवकांच्या उदासीनतेमुळे या रस्त्याचे डांबरीकरण रखडले होते. आमदार सुधीर गाडगीळ यांच्या निधीतून या रस्त्याचे काम मंजूर करण्यात आले होते. आमदार गाडगीळ यांनी अवघ्या दोनच दिवसात हे काम सुरू केले. हे काम होऊ नये यासाठी स्थानिक नगरसेवक प्रयत्नशील होते मात्र अखेर नागरिकांचा विजय झाल्याची प्रतिक्रिया स्थानिक नागरिक व्यक्त करीत आहेत.  पावसाळ्या पूर्वी या रस्त्याचे डांबरीकरण करण्याची ग्वाही दिली होती आणि आज हा रस्ता डांबरी झाल्याने  स्थानिक नागरिकांनी आभार मानले आहेत. तसेच या कामाबाबत नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.