संजय घोडावत फौंडेशनने दिला ५ लाख लोकांना आधार
संजय घोडावत फौंडेशनने दिला ५ लाख लोकांना आधार .

कोल्हापूर : कोरोना विषाणूने भारतात थैमान घातले आहे. सुमारे ५० हजाराहून अधिक लोक कोरोनाने ग्रस्त आहेत. अशा कठीण समयी मजूर, बेघर वसाहत, झोपडपट्टी, ऊसतोड कामगार, रोजंदारी कामगार यांची अन्नाची परवड होऊ नये म्हणून संजय घोडावत फौंडेशन ने ३ मे अखेर मोफत अन्न पुरविले. यामध्ये ४ लाखाहून अधिक लोकांना अन्न पुरवठा, ८० हजाराहून अधिक कुटुंबियांना रेशन पुरवठा, ६० हजाराहून अधिकांना फूड पॅकेट, ३० हजारांहून अधिकांना हॅन्ड ग्लोव्हज चे वाटप, १५ हजारांहून अधिक सेवकांना भोजन व्यवस्था, १० हजाराहून अधिकांना फेसमास्क चे वाटप करण्यात आले आहे. याचबरोबर ६ हजाराहून अधिकांना मोफत समुपदेशन, ६०० हुन अधिक आरोग्य अधिकारी, डॉक्टर, परिचारिका व आरोग्य कर्मचाऱ्यांना पीपीई कीट चे वाटप  करण्यात आले आहे. अहमदाबाद, बेळगाव, हुबळी, कोल्हापूर व सांगली याठिकाणी १४ हुन अधिक कम्युनिटी किचन चा उपक्रम यशस्वीरीत्या राबविला. घोडावत फौंडेशन ने मनुष्याप्रमाणे प्राण्यांच्या संगोपन व खाद्याची जबाबदारी पेलत ५ हजाराहून अधिक प्राण्यांना जीवदान दिले आहे. याव्यतिरिक्त घोडावत फाऊंडेशनने लॉकडाऊन च्या काळात वृक्ष संवर्धनाकडे ही लक्ष देत सांगली ते शिरोळ रस्त्यावर सुमारे १० हजार वृक्षांना दररोज टँकर ने पाणी देत संगोपन केले आहे. एकंदरीतच कोरोना च्या कठीण काळात मनुष्य, प्राणी व वनस्पती यांना जगवून त्यांना मायेचा उबारा देण्याचे दातृत्व उद्योगपती श्री.संजय घोडावत यांनी दाखविल्यामुळे सर्व स्तरावरून त्यांचे कौतुक होत आहे.याचबरोबर या आधीही संजय घोडावत फौंडेशन मार्फत शिरोळ, हातकणंगले तालुक्यातील गावांना मोफत जंतुनाशक व औषध फवारणी किट चे वाटप करण्यात आले आहे. तसेच ज्या गावांकडे औषध फवारणीसाठी लागणारी साधने उपलब्ध नाहीत त्या गावामध्ये संजय घोडावत फौंडेशन मार्फत मोफत औषध फवारणी केली गेली आहे.संजय घोडावत फौंडेशनचे मार्गदर्शक श्री.श्रेणीक घोडावत व त्यांच्या टीम च्या या सामाजिक उपक्रमात युनायटेड फर्स्ट चे अध्यक्ष श्री.साजन शाह व त्यांची टीम सहकार्य करीत आहे.



श्री.संजयजी घोडावत यांनी आजवर अंधअपंग शाळा, पूरग्रस्त, अनाथालये, दुष्काळग्रस्त शेतकरी, शहीद जवानांचे कुटुंब, आरोग्यकेंद्रे, सेवाभावी संस्था, राष्ट्रीय खेळाडू, गरीब गरजूंना मदतीचा हात पुढे करून सामाजिक भान जपले आहे.
याबाबत बोलताना श्री संजयजी घोडावत म्हणाले '' भारत कोरोनावर नक्की मात करणार. याकाळात गरजू लोकांची अन्नामुळे उपासमार होऊ नये म्हणून हा उपक्रम राबविण्यात आला. याचबरोबर प्राणी व वनस्पती संगोपणाकडे ही आमच्या फौंडेशन च्या टीम ने युद्धपातळीवर मोहीम राबवून ती सफल केली. यापुढेही अशा कठीण समयी घोडावत फौंडेशनचा मदतीचा हात असेल". या कोरोना च्या कठीण काळात फौंडेशन च्या माध्यमातून लोकांना मदत करणाऱ्या फौंडेशनच्या सर्व स्वयंसेवकांचे श्री.संजयजी घोडावत यांनी कौतुक करून आभार मानले.