पी. एम. केअर फंडासाठी कच्छी जैन सेवा समाज तर्फे ५१ हजाराची मदत.

पी. एम. केअर फंडासाठी कच्छी जैन सेवा समाज तर्फे ५१ हजाराची मदत.


सांगली, ता. ६ : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी केंद्र सरकार सर्व तर्‍हेचे प्रयत्न करत आहे. कोरोना विरुद्धच्या या लढ्यात सरकारला सहकार्य करण्यासाठी कच्ची जैन सेवा समाजच्या वतीने पी. एम. केअर पदासाठी 51 हजार रुपयांचा मदतीचा धनादेश आमदार सुधीर गाडगीळ यांच्याकडे देण्यात आला. जगभरात कोरोनाचा संसर्ग वेगाने होत आहे. हा संसर्ग रोखण्यासाठी सगळे देश प्रयत्न करत आहेत. भारतातही केंद्रातील पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या सरकारने योग्य नियोजनाद्वारे कोरोनाचा संसर्ग रोखण्यात यश मिळवले आहे. या कामी पोलीस, डॉक्टर्स, नर्स, महापालिका नगरपालिकांचे कर्मचारी, अधिकारी, जिल्हा प्रशासन तसेच समाजातील इतर स्वयंसेवी संघटना यांचे सहकार्य लाभत आहे. या लढ्यात सरकारला आर्थिक पाठबळ देण्यासाठी पी.एम. केअर फंड निर्माण केला आहे. या फंडासाठी सांगली कच्छी जैन सेवा समाजच्या वतीने आज 51 हजार रुपयांची मदत धनादेशाद्वारे आमदार सुधीर दादा गाडगीळ यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. जागतिक महामारी कोरोना covid-19 च्या मदतीसाठी श्री सांगली कच्छि जैन सेवा समाजचे चंद्रकांत मालदे, हरीश लालन, निलेश गाला, राजेश शहा, समीर शहा यांनी आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या कडे ५१ हजाराचा धनादेश सुपूर्द केला. त्याबद्दल आमदार गाडगीळ यांनी  जागतिक महामारी कोरोना मदतीबद्दल आभार मानले.