राष्ट्रवादीच्या पुढाकाराने मनपा कर्मचार्‍यांची आरोग्य तपासणी. 


 


सांगली -कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अहोरात्र राबणाऱ्या  महानगरपालिका कर्मचार्‍यांची राष्ट्रवादीच्यावतीने रविवारी आरोग्य तपासणी करण्यात आली. येथील राणी सरस्वतीदेवी कन्या शाळा येथे शिबारात 976 जणांची तपासणी करण्यात आली.


आयुक्त नितीन कापडणीस यांनी कर्मचार्‍यांची तपासणी सुरू असलेल्या ठिकाणी भेट देऊन आयोजकांचे आभार मानले. 


यावेळी शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज म्हणाले, कोरोनाचे संकट महापालिका क्षेत्रावर घोगांवत असताना  जिवाची पर्वा न करता कर्मचारी दोन महिने रात्रंदिवस राबत आहेत.  त्यांच्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. त्यासाठीच हे शिबीर घेतले.


विधानसभा क्षेत्र अध्यक्ष कमलाकर पाटील म्हणाले, शहराला कोरोनामुक्त ठेवण्यासाठी मनपा, जिल्हा आरोग्य व पोलिस यंत्रणेचे प्रत्येकजण योद्ध्याप्रमाणे लढत आहेत. त्यांच्यामुळे शहर सुरक्षित आहे.   यावेळी गटनेते मैनुद्दीन बागवान, महापालिका आरोग्य अधिकारी डॉ. श्री. आंबोळे, अल्पसंख्याक सेल शहरजिल्हाध्यक्ष आयुब बारगीर, नगरसेवक सागर घोडके, अभिजीत हारगे, पवित्रा केरिपाळे, संगिता हारगे, डॉ. नर्गीस सय्यद,  मालन हूलवान, स्वाती पारधी, विनया पाठक, आझम काझी, अनिता पांगम, विशाल हिप्परकर, शुभम जाधव, ज्योती आदाटे, संजय सुनके, सोमनाथ सुर्यवंशी, युसुफ जमादार, आशा पाटील, संदीप कांबळे, राधिका हारगे, वंदना चंदनशिवे, शुभम ठोंबरे, मनोज भिसे, अकबर शेख, आशा पाटील, उत्तम कांबळे, वैशाली कळके, आदी उपस्थित होते.


या तपासणी शिबीरासाठी डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ. पृथ्वीराज पाटील, डॉ. अमर पाटील, डॉ. संदिप कुंडले, डॉ. रियाज मुजावर, डॉ. चंद्रशेखर जाधव, डॉ. मानसी घोडके व महापालिका आरोग्य कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.