तुंग येथील बालिकेच्या खुनाचा उलगडा : स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस यश .

तुंग येथील बालिकेच्या खुनाचा उलगडा : स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस यश. सांगली - सांगली पोलीस ठाणे कडील तुंग येथील चांदोली वसाहत मधील वासु पाटील यांचे ऊसाचे शेतामध्ये एका ८ वर्षीय लहान मुलीचा खुनाची घटना दि. २१/०५/२०२० रोजी सकाळी ०८.०० वा चे सुमारास घडल्याने सदर घटनेबाबत सांगली ग्रामीण पोलीस ठाणे येथे अज्ञात इसमाविरुध्द गुन्हा नोंद झाला आहे.


सदर घटनेचे ठिकाणी मा.पोलीस अधीक्षक श्री. सुहेल शर्मा सो, अपर पोलीस अधीक्षक मनिषा दुबुले मॅडम, उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक विरकर, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील श्रीकांत पिंगळे तसेच त्यांचेकडील पथक व सांगली ग्रामीण पो. ठाणेकडील पोलीस निरीक्षक सिंदकर व त्यांचेकडील पोलीस कर्मचारी असे तुंग येथील चांदोली वसाहत मधील वासु पाटील यांचे ऊसाचे शेतामध्ये तपास कामी दाखल झाले होते. मा. पोलीस अधीक्षक श्री. सुहेल शर्मा यांनी सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून सदर गुन्हयातील आरोपीचा छडा लावणेबाबत सक्त सुचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे सदर गुन्हयातील आरोपीचा तपास लागेपर्यंत वरील पथकांचा  तुंग येथे मुक्काम होता.आज रोजी सदर गुन्हयाचा तपास करीत असताना सदर गुन्हयातील लहान मुलगी ही घरातून दुकानाकडे खाऊ आणणेसाठी गेली असता दुकानाच्या पाठीमागील बाजूस ऊस पिकाचे चेंबर जवळ अल्पवयीन मुलगा हा सदर ठिकाणी, त्या मुली सोबत खेळत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलीस निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांना मिळाली. सदरचा मुलगा अल्पवयीन असल्याने बालन्याय अधिनियम मधील तरतुदीचे पालन करून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने त्याचेकडे विश्वासात घेवून विचारपूस केली असता, यातील अल्पवयीन मुलगा हा त्याचेकडील मोबाईलवर पोर्न फिल्म त्या मुलीस दाखवून तिचेवर लैंगिक अत्याचार करून, दगडाने डोक्यात दुखापत करुन  तिचा तिच्याच  लेगीजने गळा आवळून खुन केल्याच्या गुन्हयाची कबूली दिल्याने, त्यास पुढील तपास कामी उपविभागीय पोलीस अधिकारी श्री अशोक विरकर यांचेकडे सुपूर्द करणेत आला. त्यांनी सदर बालअपचारी याचे कड़न गुन्हयामध्ये वापरलेला मोबाईल व गुन्हयाचे वेळी अंगावर असणारे कपडे जप्त करणेत आले आहे.


सदर गुन्हयाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग सांगली श्री अशोक विरकर हे करीत आहेत.
सदरचा गुन्हा उघडकीस आणणेकामी पोलीस निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांचे मार्गदर्शनाखाली पोउपनि/ प्रविण शिंदे, प्रदीप चौधरी, शरद माळी, अंतम खाडे, सपोफौ/ सागर पाटील, जगन्नाथ पवार, पोहेकॉ/ बिरोबा नरळे, राजू मुळे, अमित परीट, निलेश कदम, अरूण औताडे, जितेंद्र जाधव, मेघराज रूपनर, मारूती साळुखे, पोलीस नाईक सागर लवटे, संदिप गुरव, संदिप नलवडे, वैभव पाटील, राहुल जाधव, संदिप पाटील, पोकॉ/ अनिल कोळेकर, गौतम कांबळे, संतोष गळवे, आर्यन देशिंगकर, चा. शंकर पाटील, शाम काबुगडे, सचिन  सर्यवंशी, अरूण सोकटे, बजरंग शिरतोडे, निसार मुलाणी यांनी सहभाग घेतला .