धारावीतील एकूण करोना बाधितांची संख्या ११९८ वर.

 


 


  


 


धारावीतील एकूण करोना बाधितांची संख्या ११९८ वर.


मुंबई : धारावी परिसरात करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढतच आहे. आज दिवसभरात ५३ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळं आता धारावीतील एकूण बाधितांची संख्या ११९८ वर पोहोचली आहे.
धारावी परिसरात आज आढळून आलेल्या नवीन रुग्णांमध्ये ३८ पुरुष रुग्ण, तर १५ महिला रुग्ण आहेत. आझाद नगर, शाहू नगर, गणेश नगर, समता नगर, कुंचीकुर्वे नगर, माटुंगा लेबर कॅम्प, पंचशील बिल्डिंग, कुंभारवाडा, इंदिरा नगर, चौघुले चाळ, ट्रान्झिट कॅम्प, जीवन ज्योतील रहिवासी संघ, जनता चाळ, कमला नेहरू नगर, विजय नगर, सुभाष नगर, मुकुंद नगर आदी परिसरांत हे रुग्ण सापडले आहेत. आज नोंद झालेल्या करोनाबाधितांमध्ये ४० वर्षांखालील आणि ४० ते ६० या वयोगटातील रुग्णांची संख्या अधिक असल्याचं दिसून येतं. या ५३ नवीन बाधितांसह एकूण रुग्णसंख्या ११९८ वर पोहोचली आहे. धारावीपाठोपाठ माहीम आणि दादर परिसरातही रुग्णसंख्या वाढत आहे. आज दिवसभरात माहीममध्ये ११ नवीन रुग्ण सापडले. त्यामुळं माहीममधील रुग्णसंख्या १८७ झाली आहे. आज सापडलेल्या बाधित रुग्णांमध्ये तरुण सर्वाधिक आहेत. दादरमध्येही चार नवीन रुग्ण आढळले आहेत. येथील रुग्णसंख्या १५४ इतकी झाली आहे.
दरम्यान, धारावीतील शाहूनगर पोलीस ठाण्याला गृहमंत्री अनिल देशमुख यांनी भेट देऊन पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी गृहमंत्र्यांनी कर्तव्य बजावताना करोनाच्या संसर्गामुळे मृत्यू झालेले पोलीस कर्मचारी अमोल कुलकर्णी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना श्रद्धांजली वाहिली.