शानदार स्पोर्टस् आणि आरोग्य राज्य मंत्री यड्रावकर तर्फे महिला सफाई कामगारांना आरोग्य साहित्याच्या किटचे वाटप.

शानदार स्पोर्टस् आणि आरोग्य राज्य मंत्री यड्रावकर तर्फे महिला सफाई कामगारांना आरोग्य साहित्याच्या किटचे वाटप


जयसिंगपूर -
शानदार स्पोर्टस् आणि एज्युकेशन असोसिएशन जयसिंगपूर तर्फे महाराष्ट्राचे आरोग्य राज्य मंत्री नामदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांचा हस्ते  जयसिंगपूर नगरपरिषद मधील 55 महिला सफाई कामगारांना आरोग्य साहित्याच्या किटचे वाटप करण्यात आले.
यावेळी बोलताना मंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर म्हणाले या सफाई कामगार आहेत त्यांच्या साठी म्हणुन त्यांच्या सवच्छते साठी आणि त्यांच्या सुरक्षते साठी आज या ठिकाणी या किटचा प्रत्येकाला  वाटप केले  खय्रा अर्थाने शानदार स्पोर्टस् अण्ड एज्युकेशन असोसिएशनने आजपर्यंत अनेक सामाजिक उपक्रमामध्ये आपल्या परीने भाग घेऊन समाजाशी आपण काहीतरी देणं लागतय हीची जान ठेवुन सातत्याने समाजामध्ये वेगवेगळ्या प्रसंगी मग ते महापूर असो  की वेगवेगळ्या लोकांना उत्तेजन प्रोत्साहन देण्याच्या बाबतीत असेल सातत्याने काम करत आहे  आज सुध्दा या कोरोनाच्या या सगळ्या  प्रसंगा मध्ये आपल्या मदतीचा हात पुढे केला त्या बद्दल मी या शानदार स्पोर्टस् अॅण्ड एज्युकेशन असोसिएशनचा मना पासून आभार मानतो.
यावेळी शानदार स्पोर्टसचे संस्थापक अध्यक्ष डाॅ अख्तर पटेल, सचिव डाॅ शकिला पटेल मॅडम, इकबाल इनामदार, जयसिंगपूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी गवळी मॅडम, नगरसेवक राहुल बंडगर, महेश कलकुटगी, राजेंद्र झेले, सुभाष मुरगुंडे आदी उपस्थित होते