क्रिकेटची पुन्हा सुरुवात करण्याच्या दृष्टीने सराव सुरू.पण ......

क्रिकेटची पुन्हा सुरुवात करण्याच्या दृष्टीने सराव सुरू.पण ..


मुंबई - क्रिकेटची पुन्हा सुरुवात करण्याच्या दृष्टीने लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात नियम शिथिल झाल्यास 18 मे पासून कौशल्य आधारित आऊटडोअर सराव सुरू करण्याची तयारी बीसीसीआयने दाखवली आहे. कोषाध्यक्ष अरुण धुमल यांनी गुरुवारी हे संकेत दिले होते. लॉकडाऊनमध्ये अडकलेले भारतीय खेळाडू सध्या घरातच फिटनेसवर भर  देत आहेत. आत दोन महिन्यांनंतर टीम इंडियाचे खेळाडू मैदानावर सराव करताना दिसणार आहेत. पण, टीम इंडियाची कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार रोहित शर्मा यांना त्यात सहभाग घेता येणार नाही.


इंग्लंड क्रिकेट बोर्ड आणि क्रिकेट ऑस्ट्रेलिया यांनी लवकरच खेळाडूंच्या सराव शिबीराला सुरुवात करणार असल्याचे सांगितले होते. त्यानंतर बीसीसीआयनंही तशी तयारी दर्शवली आहे. त्यानुसार कठोर नियमांचं पालन करून बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीतर्फे खेळाडूंच्या सरावाला सुरुवात होणार आहे. पण, विराट व रोहितला त्यात सहभाग घेता येणार नसल्याचे, बीसीसीआयचे खजिनदार अरुण धुमल यांनी सांगितले. ते म्हणाले,''मुंबईत लॉकडाऊनच्या नियमांत शिथिलता येण्याची शक्यता फार कमी असल्यामुळे विराट व रोहित यांना सराव शिबीरात सहभागी होता येणार नाही.''