पुण्यश्लोक अहिल्यादेवींचे कार्य सर्वसामान्य रयतेसाठी ! – आ. सुधीर गाडगीळ
पुण्यश्लोक अहिल्यादेवींचे कार्य सर्वसामान्य रयतेसाठी ! – आ. सुधीर गाडगीळ.

 



सांगली - “ पुण्यश्लोक अहिल्याबाईंनी आपले राज्य उत्तम प्रकारे सांभाळले. पण राज्याच्या उत्पन्नातून येणारी सर्व रक्कम ही गोरगरीब जनतेसाठी, धर्मशाळा, अन्नछत्र यासाठीच खर्च केली. राज्याच्या प्रमुख असलेल्या अहिल्याबाई शेवटपर्यंत वैराग्यपूर्ण जीवन जगल्या. त्यांचे स्मरण आपल्या जनतेला कायम राहील.” असे विचार आ. सुधीर गाडगीळ यांनी व्यक्त केले. पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या जयंती प्रसंगी ते बोलत होते.
आ. गाडगीळ यांच्या कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमात प्रारंभी पु. अहिल्यादेवींच्या प्रतिमेचे पूजन आ. गाडगीळ आणि ज्येष्ठ नेते प्रकाशतात्या बिरजे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी पूर्व मंडल अध्यक्ष दरीबा बंडगर, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष दीपकभाऊ माने, नगरसेवक संजय यमगर, नगरसेवक प्रकाश ढंग, नगरसेविका सविता मदने, नगरसेविका कल्पना कोळेकर,  बंडोपंत सरगर, रघुनाथ सरगर, अरुण दांडेकर, गणपती साळुंखे, दलितमित्र अशोकराव पवार, युवा मोर्चा सरचिटणीस मकरंद महामुलकर, अल्पसंख्यांक मोर्चा अध्यक्ष गौस पठाण, आबासाहेब जाधव, श्रीधर जाधव, अमोल कणसे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.