कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असल्याने जिल्ह्यात भीतीचे वातावरण.

कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असल्याने जिल्ह्यात भीतीचे वातावरण.


                                                                 कोल्हापूर-  आज ( बुधवारी ) 19 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असताना आत्ताच हाती आलेल्या अहवालानुसार आणखी 16 कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.आज ( बुधवारी ) दिवसभर एकूण 35 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे . सीपीआर प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत आजची कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण संख्या 35 असून जिल्ह्याची एकूण कोरोना पॉझिटिव्ह संख्या 171 झाली आहे . कोरोना बाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असल्याने जिल्ह्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे . वाढत्या कोरोनाच्या संख्येमुळे सीपीआर रुग्णालयातील आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण निर्माण झाला आहे .