रेशनकार्ड नसणाऱ्या नागरिकांना शासनाच्या रेशनचा लाभ द्या : मदनभाऊ पाटील युवा मंच.

रेशनकार्ड नसणाऱ्या नागरिकांना शासनाच्या रेशनचा लाभ द्या : मदनभाऊ पाटील युवा मंच.


सांगली : सांगली शहरातील रेशनकार्ड नसणाऱ्या नागरिकांना शासनाच्या रेशनचा लाभ मिळावा अशी मागणी मदनभाऊ पाटील युवा मंचाकडून अन्नधान्य वितरण अधिकारी यांच्याकडे करण्यात आली. शासनाच्या आदेशानुसार सांगली आणि कुपवाड परिसरातील अनेक कुटुंबांचे रेशनकार्ड नसल्यामुळे त्यांच्या खाण्यापिण्याची मोठी अडचण झाली आहे. त्यामुळे रेशनकार्ड नसणाऱ्या अशा नागरिकांना सुद्धा लाभ मिळावा अशी मागणी मदनभाऊ पाटील युवा मंचाने केली आहे. याबाबतचे शासन आदेश तसेच जीआर सुद्धा मंचकडून अन्नधान्य वितरण अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. यावेळी युवा मंचाचे अध्यक्ष आनंदा लेंगरे, नगरसेवक संतोष पाटील, प्रकाश मुळके, मनगू सरगर, नगरसेविका रोहिणी पाटील, मदिना बारुदवाले आदी उपस्थित होते.