फास्टफूड विक्रेत्यांच्या सहनशीलतेचा कडेलोट होण्यापूर्वीच त्यांना मदत द्यावी : मा.आमदार नितीन शिंदे
सांगली - प्रभाग १६ मधील फास्टफूड विक्रेत्यांना भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष शेखर इनामदार,माजी आमदार नितीन शिंदे,फास्टफूड संघटनेचे अध्यक्ष टेंगले यांच्याहस्ते जीवनावश्यक वस्तूंच्या साहित्याचे वाटप करण्यात आले.त्यावेळी माजी आ.शिंदे बोलत होते.स्वागत व प्रास्ताविक करताना आदित्य पटवर्धन यांनी,;लॉकडाउनचा फटका बंगलेवाल्याना नव्हेतर सर्वसामान्यांना अधिक बसला आहे.हातगाडी व्यवसायावरच अनेकजण अवलंबून आहेत.कार्यक्रमाचे फोटो पाहून अनेकजण मदत करतात असे सांगितले.अनिल शेटे यांनी,'गेल्या अडीच महिन्यापासून व्यवसाय बंद असल्याने अनेकांनी कर्जे काढून कुटुंबाची गुजराण केली असल्याचे सांगितले.संघटनेचे अध्यक्ष टेंगळे यांनी,'फास्टफूडच्या व्यवसाय कधी सुरु होईल याची शास्वती नाही.गेल्या अडीच महिन्यापासून आम्ही घरीच आहोत.आम्हाला व्यवसायाच्या ठिकाणाहून पार्सल देण्याची परवानगी मिळावी अशी अपेक्षा व्यक्त करून.शासकीय यंत्रणेकडून कोणतीच मदत मिळत नसल्याची खंत व्यक्त केली.माजी आमदार नितीन शिंदे यांनी,'फास्टफूड विक्रेत्यांचे हातावरचे पोट आहे.त्यांचा व्यवसाय कधी सुरु होईल याची खात्री देता येत नाही.त्यांच्याकडे शिल्लक असणारा पैसाही संपत आलाय.मदतीची असताना त्यांना मदत मिळत नाही.कर्नाटक व दिल्ली सरकारप्रमाणे महाराष्ट्र सरकार का मदत करीत नाही. दारू दुकानांना पोलीस संरक्षण देऊन विक्री करण्याची परवानगी मिळत असेलतर फास्टफूड विक्रेत्यांना का परवानगी मिळत नाही.सरकार आणि अधिकाऱ्यांमध्ये समन्वयाचा आभाव आहे.फास्टफूड विक्रेत्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहत बसू नका.त्यांना परवानगी मिळावी यासाठी रेटा लावू असे सांगितले.मनोगत व्यक्त करताना शेखर इनामदार यांनी,'शिंदे दाम्पत्याने वंचित घटकाला न्याय देत त्यांना सर्वांच्या नजरेसमोर आणले.त्यांची हि मदत आपुलकी वाढवणारी आहे.यातून सरकार आणि प्रशासनाचे लक्ष वेधले जावे.सर्व अडचणींवर मात करणारी सांगली आज शांत झाली आहे.दारू दुकानाला परवानगी देता मग हातगाडी व्यावसायिकांकडे दुर्लक्ष का.त्यांच्या माध्यमातून अत्यल्प दरात सर्वसामान्यांच्या पोटाची भूक भागवली जाते.चार लॉकडाउन विक्रेत्यांनी अत्यंत शांततेने पार पाडले.त्यांच्या पोटाला मिळत नसल्याने त्यांच्या सहनशीलतेचा अंत होतोय असे सांगितले.यावेळी संघटनेचे उपाध्यक्ष अशोक सरगर,प्रसाद रिसवडे,अजय काकडे,अस्लम शेख,ओंकार पवार,श्रीधर मेस्त्री,पृथ्वीराज पवार,गणेश पवार,निखिल सावंत,लीना सावर्डेकर,आकाश काळेल,विनायक सरगर यांच्यासह फास्टफूड विक्रेते उपस्थित होते.