अनाथाश्रम, महिला वृध्दाश्रमास हापूस आंब्याची भेट आमदार सुधीर गाडगीळ यांचा उपक्रम.

अनाथाश्रम, महिला वृध्दाश्रमास हापूस आंब्याची भेट आमदार सुधीर गाडगीळ यांचा उपक्रम.








सांगली, - शहरातील विविध सामाजिक संस्थांना आमदार सुधीर गाडगीळ यांनी आज हापूस आंब्याची भेट दिली. अनाथाश्रम, सावली बेघर निवारा केंद्र आदी ठिकाणी हापूस आंबे भेट दिले. दरवर्षी उन्हाळ्याचा हंगाम म्हणजे हापूस आंब्याची चव घेण्याचा मोसम असतो. मात्र यंदा कोरोनाच्या लॉक डाऊन मुळे हापूस आंबे खायला मिळणे कठीण झाले आहे. हे लक्षात घेऊन आमदार गाडगीळ यांनी स्वतः प्रयत्न करून अनाथाश्रम, महिला वृध्दाश्रम, मुलांचे निरीक्षण गृह या संस्थासाठी हापूस आंबे भेट देण्याचा निर्णय घेतला  व अखिल भारतीय महिला संस्था भगिनी निवेदिता प्रतिष्ठान, वेलणकर अनाथालय, कै. दादुकाका भिडे मुलांचे निरीक्षणगृह (बालगृह)चे  मुकुंद कुलकर्णी, सावली बेघर निवारा केंद्रचे मुस्तफा मुजावर यांच्याकडे आमदार गाडगीळ यांनी हापूस आंबे भेट दिले. यावेळी यांच्या या उपक्रमाचे अभिनंदन मानले