राज्यात रेडझोन वगळता १७ में नंतर काही प्रमाणात शिथिलता - ना. विश्वजीत कदम

राज्यात रेडझोन वगळता १७ में नंतर काही प्रमाणात शिथिलता- ना. विश्वजीत कदम.


जत-  कोरोना संसर्ग प्रार्दुभाव याच्या पार्श्वभूमीवर रेडझोन वगळता राज्यातील काही भागात १७ में नंतर शिथिलता मिळणार आहे. त्यामुळे नागरिकांना काही प्रमाणात सवलत मिळेल. अशी माहिती राज्याचे सहकार राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी दिली. ते जत येथे विविध विभागाच्या घेण्यात आलेल्या आढावा बैठकित बोलत होते.
          यावेळी घेण्यात आलेल्या आढावा बैठकि दरम्यान कोरोना संसर्ग रोखण्यासाठी मूलभूत स्वच्छतेची खबरदारी बाळगणे आवश्यक आहे. त्याचसाठी डॉ. पतंगराव कदम सोनहिरा सहकारी साखर कारखान्याने सॅनेटायझरची निर्मिती केली आहे. कारखान्याचे संस्थापक डॉ. पतंगराव कदम यांच्या प्रेरणेने व आदरणीय मोहनदादा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली ना. डॉ. विश्वजीत कदम यांच्या पुढाकाराने जत येथील आरोग्य कर्मचारी, स्थानिक स्वराज्य संस्था, महावितरण, पोलीस अधिकारी, कृषी विभाग, महसूल विभाग, जत नगरपरिद इत्यादी अत्यावश्यक सेवेतील 2100 कर्मचाऱ्यांना सँनिटायझर व मास्क वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी माहिती दिली की, १७ मे नंतर केंद्र शासन लाँकडाऊन संदर्भात निर्णय घेणार आहे. नियम व अटीच्या अधिन राहून व्यवसाय सुरू करावेत असे राज्य शासनाचे धोरण आहे. जत तालुक्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांचे काम समाधानकारक असल्यामुळे येथे कोरोना संसर्ग व प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला नाही. बाहेरून आलेल्या दोन नागरिकांना कोरोनाचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यांच्यावर मिरज येथे उपचार सुरू आहेत. इंस्टीट्यूशनल व संस्थात्मक काँरनटाईन हे सर्वांसाठी बंधनकारक आहे .
           जत तालुक्याच्या काही भागात अवकाळी पावसामुळे द्राक्षबागा,बेदाणा, डाळींब व आंबा इ. फळपिकांची मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्याचा पंचनामा करण्याचे आदेश कृषी विभागाला देण्यात आले आहेत. शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी शासन स्तरावर यासंदर्भात निर्णय होईल. शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा आहे. असेही मंत्री विश्वजीत कदम यांनी यावेळी सांगितले.
           बाहेरून आपल्या गावात व तालुक्यात जे नागरिक येत आहेत, ते आपलेच बांधव आहेत, ते कोणीही परके नाहीत त्यांना स्थानिक नागरिकांनी सन्मानाची वागणूक द्यावी, परंतु सुरक्षा महत्त्वाची आहे. त्यासाठी खबरदारी घेण्याची गरज आहे. असे सांगून मंत्री विश्वजीत कदम पुढे म्हणाले की,  बाहेरील राज्यातून आपल्या राज्यात येणारे व बाहेर जिल्ह्यातून आपल्या जिल्ह्यात येणाऱ्या नागरीकासाठी  शासनाकडून मोफत प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे . ऑनलाईन फार्म भरून नागरिकांनी या संधीचा उपयोग करून घ्यावा . स्वस्त धान्य दुकानातून मे २०२० महिन्याचे ९२ टक्के धान्य वाटप झाले आहे. स्वस्त धान्य दुकानातून व्यवस्थित धान्य वाटप सुरू असल्यामुळे त्यासंदर्भात तक्रारी नाहीत. यासाठी महसूल विभागाने योग्य नियोजन केले आहे. जत एसटी बसस्थानक परिसरात दोनशे शिवभोजन थाळीची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. परंतु तालुक्यात इतर ठिकाणी जर सेंटर सुरू करणे आवश्यक असेल, तर तसा प्रस्ताव महसूल विभागाने सादर करावा त्याला तात्काळ मान्यता देण्यात येईल असे आश्वासन मंत्री विश्वजीत कदम यांनी यावेळी
दिले.