सांगली शहरात कोरोणाचा शिरकाव: एकाचा अहवाल पॉझिटिव्ह.
सांगली - सांगली येथील रेव्हिन्यू कॉलनी येथे मुंबईवरून बेकायदेशीरपणे आलेल्या एकाचा स्बाव तपासणीसाठी 6 मे रोजी घेण्यात आला होता. तपासणीसाठी घेण्यात आलेला स्वाब अहवाल आज पॉझिटिव्ह आला आहे. कॉन्टॅक्ट ट्रेसिंग गतीने करण्यात येत असून आवश्यक उपाययोजना तातडीने करण्यात येत आहेत अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ.अभिजित चौधरी यांनी दिली.