महापालिका आयुक्तांचा व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे नगरसेवकांशी संवाद : नगरसेवकांच्या शंकांचे निरसन.

सांगली महापालिका आयुक्तांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे साधला 51 नगरसेवकांशी संवाद : नगरसेवकांच्या शंकांचे केले निरसन


सांगली : सांगली महापालिकेचे आयुक्त नितीन कापडणीस यांनी आज  महापालिकेच्या नगरसेवकांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. या व्हिडिओ कॉन्फरन्सला नगरसेवकांनी प्रतिसाद देत तब्बल 51 नगरसेवकांसह सहा अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला. आयुक्त कापडणीस यांनी सव्वा तास सर्व सदस्यांच्या शंकांचे निरसन केले.
   आज महापालिका मुख्यालयात महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सांगली महापालिकेच्या नगरसेवकाशी संवाद साधला. यावेळी व्हिडिओ कॉन्फरस सोबत उपायुक्त स्मृती पाटील, राजेंद्र तेली यांच्यासह चार सहायक आयुक्तांनी सुद्धा सहभाग घेतला. या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये मनपा क्षेत्रातील परप्रांतीय मजुरांना पाठवणेबाबत ज्या प्रक्रिया आहेत याबाबत आयुक्त नितीन कापडणीस यांनी सर्व सदस्यांना मार्गदर्शन केले. यावेळी परप्रांतीयांना परत पाठवणेबाबतचे फॉर्म याबाबतचे नोडल ऑफिसर यांच्या बाबतही आयुक्त कापडणीस यांनी सर्व नगरसेवकांना माहिती दिली. 
तब्बल सव्वा तास सुरू असणाऱ्या या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये नगरसेवक विष्णू माने यांनी विजयनगर परिसरात प्रतिबंधित क्षेत्र उठवण्याची मागणी केली . यावर आयुक्त कापडणीस यांनी वैद्यकीय तज्ञाचा अभिप्राय घेऊन विचार करण्याची ग्वाही दिली. याचबरोबर काही सदस्यांनी मनपा क्षेत्रात बाहेरून येणाऱ्या लोकांबाबत
काय काळजी घेतली जाणार याची विचारणा केली. यावर बाहेरून येणाऱ्या लोकांची लिस्ट जिल्हाधिकारी 
यांच्या मार्फत यावर लक्ष ठेवले जात असून बाहेरून येणाऱ्या लोकांची वैद्यकीय तपासणी करूनच त्यांना होम कॉरंटाईन केले जाणार असल्याचे आयुक्त कापडणीस यांनी सदस्यांना सांगितले. या सव्वा तासाच्या चर्चेत 51 नगरसेवकांनी सहभाग घेत आपल्या शंकांचे निरसन करून घेतले.
यावेळी मनपा मुख्यालयात अग्निशमन अधिकारी चिंतामणी कांबळे, उप अभियंता वैभव वाघमारे, सिस्टीम मॅनेजर नकुल जकाते, दिनेश जाधव उपस्थित होते.