रिक्षा चालक व रेशन दुकानदार यांना हँड सानेटायझर वाटप
रिक्षा चालक व रेशन दुकानदार यांना हँड सानेटायझर वाटप.

 

 

सांगली - मा.पृथ्वीराज बाबा पाटील कॉंग्रेस शहर जिल्हाध्यक्ष सांगली यांनी स्वतः सांगली विधानसभा मतदारसंघतील रेशन दुकानांना भेटी दिल्या त्यांच्या समस्या जाणून घेतल्या व नागरिकांची कोरोणाच्या संकट काळात उपासमार होऊ नये म्हणून रेशन धान्य शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवावे असे आव्हान रेशन धान्य दुकानदारांना करण्यात आले त्याच बरोबर स्वतःचीही काळजी घेण्यासाठी सांगितले यावेळी सर्व रेशन धान्य दुकानदारांना ही हँड सानेटायझर वाटप करण्यात आले. सामाजिक कार्यात सतत अग्रेसर असणाऱ्या पृथ्वीराज पाटील फाउंडेशन सांगली यांच्या वतीने सांगली-मिरज रोड वरील व सांगली शहरात फिरणाऱ्या रिक्षाचालकांना खबरदारी म्हणून हँड सानेटायझर वाटप करण्यात आले त्याचबरोबर प्रवाशांना बसवताना मास्क आहे का हे बघूनच बसवण्याची विनंती करण्यात आली. या वेळी बिपिन कदम, सनी धोतरे, रवी खराडे, अशोक रासकर, सकलेन मुजावर, अशिष चौधरी, फिरोज मुजावर, इत्यादी कार्यकर्ते सोबत होते.