जत येथील आरोग्य कर्मचाऱ्यांना रोटरी क्लब ऑफ सांगली सिटी यांचेकडून पीपीई किटचे वाटप:  आ विक्रमसिंह सावंत यांच्या हस्ते वाटप.
जत येथील आरोग्य कर्मचाऱ्यांना रोटरी क्लब ऑफ सांगली सिटी यांचेकडून पीपीई किटचे वाटप: 

आ विक्रमसिंह सावंत यांच्या हस्ते वाटप.








जत -  देशासह महाराष्ट्रावर सध्या कोरोना या महामारीने थैमान घातले आहे. अशा परिस्थितीत अनेकांनी मदतीचे हात दिले आहेत. अशावेळी कोरोना साथीचा मुकाबला करण्यासाठी आरोग्य अधिकारी व कर्मचारी सुरक्षित राहणे आवश्यक आहे. यासाठी  रोटरी क्लब ऑफ सांगली सिटी, सांगली यांच्यावतीने पर्सनल प्रोटेक्शन किट (P P E ) हे किट आरोग्य सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना दिले आहे. यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांना काम करण्यास चालना मिळेल.

          सांगलीच्या शेवटच्या टोकाला असलेल्या जत तालुक्याला रोटरी क्लब ऑफ सांगली सिटीने केलेली मदत उल्लेखनीय असल्याचे प्रतिपादन आमदार विक्रमदादा सावंत यांनी केले. आमदार सावंत जत ग्रामीण रुग्णालयात आरोग्य कर्मचाऱ्यांना रोटरी क्लब ऑफ सांगली सिटी, सांगली यांच्यावतीने पर्सनल प्रोटेक्शन किटच्या वाटप प्रसंगी बोलत होते. यावेळी आमदार सावंत यांच्या हस्ते PPE किटचे वाटप केले.

          यावेळी आमदार सावंत म्हणाले की, कोरोना व्हायरसने सर्वत्र हाहाकार माजला असताना राज्य शासन व प्रशासन या साथीचा सामना पूर्ण तयारीनिशी करत आहे. शासन या कोरोना महामारीला थोपविण्यासाठी त्यावर उपचार व नियोजन खूप चांगल्या पद्धतीने करत आहे. शिवाय या परिस्थितीत जतचे महसूल प्रशासन, आरोग्य प्रशासन व पोलीस प्रशासन मोठ्या धैर्याने व आपल्या जिवाची पर्वा न करता काम करत आहे. महाराष्ट्रावर आपत्ती आली अश्या वेळी अनेकांनी मदतीचे हात दिले आहेत. यामध्ये कोरोना साथीचा मुकाबला करण्यासाठी आरोग्य अधिकारी व कर्मचारी सुरक्षित राहणे आवश्यक आहे. यासाठी  रोटरी क्लब ऑफ सांगली सिटी, सांगली यांच्यावतीने पर्सनल प्रोटेक्शन किट (P P E किट)आरोग्य कर्मचाऱ्यांना दिल्याबद्दल त्यांचे आभार मानतो. 

          यावेळी तालुका आरोग्य अधिकारी संजय बंडगर, डॉ.पी.पी.दैवडे, महेंद्र राऊत, गौस खतीब, माजी नगरसेवक निलेश बामणे, तसेच रोटरी क्लब सांगली सिटीचे अधिकारी, रोटरी प्रेसिडेंट प्रशांत माने, स्नेहल गौडजे व रणजित माळी व सर्व कर्मचारी उपस्थित होते.