डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील याला अखेर अटक.

सांगली : डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील याला अखेर अटक.


सांगली - विटा येथील तहसिलदार ऋषिकेत शेळके यांना शिवीगाळ, मारहाण करून पसार झालेला पैलवान चंद्रहार पाटील याला रविवारी अटक करण्यात आली. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने ही कारवाई केली. चंद्रहार पाटील याने वाळू कारणावरून तहसिलदार ऋषिकेत शेळके यांना शिवीगाळ करत मारहाण केली होती. त्यानंतर तो पसार झाला होता. याप्रकरणी त्याच्यावर विटा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आपल्यावर गुन्हा दाखल याची चाहूल लागताच त्याने अटकपूर्व जामिनासाठीही प्रयत्न केला होता. अखेर रविवारी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांच्या पथकाने चंद्रहार पाटील याला अटक केली.