- सोनी पाटगाव येथील रहस्यमय खुनाचा २४ तासात उलगडा.
- स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे यश .
सांगली - दि. २४/०५/२०२० रोजी सकाळी ०८.०० वा चे सुमारास नामदेव पाटील रा.पाटगाव ता मिरज येथील याचे शेताच्यालगत असले म्हसोबा ओढयाच्या पात्रात झुडपामध्ये अंदाजे ३५ वर्षाचे पुरूष इसम संशयास्पद रित्या मृत अवस्थेत मिळुन आला होता, यावरून मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात व्यक्ती विरूद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला होता.
या गंभीर गुन्हयाचे अनुषंगाने मा. पोलीस अधीक्षक श्री सुहेल शर्मा, अपर पोलीस अधीक्षक मनिषा दुबुले यांनी खुनाचे घटनेचे गांभीर्य पाहुन तात्काळ मयतेची ओळख पटवुन गुन्हयातील आरोपीना निष्पन्न करुन गुन्हा उघडकीस आणण्याबाबत सुचना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांना दिल्या होत्या त्याप्रमाणे गुन्हे अन्वेषन शाखेकडील पो.फौ. प्रदिप चौधरी, पो.फौ. अभिजीत सावंत व कर्मचारी यांची दोन पथके तयार करून त्यांना मार्गदर्शन व सुचना करून रवाना केले होते.त्याप्रमाणे वरील पथकाने घटनेच्या परीसरास भेट देवुन घटनास्थळाचे परिसरातील गांवे, जिल्हयातील, परजिल्हातील व सिमा भागातील पोलीस ठाणचे अभिलेखावरील मिसींग पडताळुन व मयतेचे फोटो दाखवुन मयताची ओळख पटविण्याबाबत प्रयत्न केले परंतु मयताबाबत कोणतीही ठोस माहिती मिळाली नाही.
आज रोजी घटनेच्या अनुषंगाने पुन्हा घटना स्थळी जावुन काही दुवे मिळुन येतात का याबाबत शहानिशा केली. घटना स्थळा लगत असले शेत मालक व शेतमजुर यांचेकडे सविस्तर चौकशी केली. त्यावेळी सदर मयता बाबत पोलीस नाईक सागर लवटे यांना त्यांचे खास बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, सदर व्यक्तीचा खुन हा अनैतीक संबंधातून झालेला असुन मयताचे नांव विक्रम मोहन पवार रा.चिंचणी ता.तासगांव जि.सांगली असे असल्याचे समजले.त्यावेळी अनैतीक संबंधाबाबत माहिती घेतली असता, यामध्ये सौ सारीका सुरेश माने हिचे मयतेबाबत अनैतीक संबंध होते. व तो वारंवार सौ सारीका माने हीस त्रास देवुन मारहाण करीत होता, त्याअनुषंगाने त्यावेळी सौ सारीका सुरेश माने रा पाटगाव हीस गुन्हयाचे अनुषंगाने चौकशी कामी ताबेत घेतली असता तीने व युवराज पाटील रा पाटगाव यानी अनैतिक संबधातुन होत असलेल्या भांडणाचा मनात राग धरुन वरील दोन्ही आरोपीनी काठीने जबर मारहाण करून दुखापत करून खुन केला असल्याची माहीती समोर आली आहे.
दिनांक २४.५.२०२० रोजी दाखल झाले पाटगांव ता मिरज येथील अज्ञात इसमाच्या खुनाचा छडा लावुन गुन्हयात सहभाग असणारे आरोपी नामे युवराज भानुदास पाटील वय-३१ रा पाटगांव ता.मिरज व सौ सारीका सुरेश माने वय-२९ रा पाटगांव ता मिरज याना ताबेत घेतले आहे, तसेच मयत इसमाचे नांव विक्रम मोहन पवार रा. चिंचणी ता. तासगांव असल्याचे निष्पन्न केले आहे. वरील निष्पन्न ओरापी यांना पुढील तपासकामी मिरज ग्रामीण पोलीस ठाणे कडे रिपोर्टने देणेत आले आहे.
सदरचा गुन्हा उघडकीस आणणेकामी पोलीस निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांचे मार्गदर्शनाखाली पो.फौ. प्रदीप चौधरी, पो.फौ. अभिजीत सावंत, बिरोबा नरळे, निलेश कदम, जगन्नाथ पवार, संजय कांबळे, सागर लवटे, दरीबा बंडगर, संदिप गुरव, संदिप नलवडे, अनिल कोळेकर, संतोष गळवे, सुधीर गोरे, हेमंत ओमासे, शशीकांत जाधव, सुनिल लोखंडे, चेतन महाजन, गौतम कांबळे, सुप्रिया साळुखे, सीमा तोडकर, विमल नंदगावे, ज्योती चव्हाण चालक शंकर पाटील यांनी सहभाग
घेतला .