सांगली महापालिकेचे उपायुक्त राजेंद्र तेली प्रशासकीय सेवेतून निवृत्त: मनपा आयुक्तासह मुख्याधिकाऱ्यांनी केला सत्कार.





 

 

 

सांगली : सांगली महापालिकेचे उपायुक्त राजेंद्र बसवानी तेली हे आज आपल्या प्रशासकीय सेवेतून निवृत्त झाले. सेवानिवृत्तीनिमित्त मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांच्यासह जिल्ह्यातील सर्व नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांनी राजेंद्र तेली यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार केला.

    उपायुक्त तेली हे जयसिंगपूर हे जयसिंगपूर नगरपरिषदेचे सीईओ असताना त्यांची सांगली महापालिकेकडे 29 जुलै 2019 रोजी बदली झाली. बदलीच्या पहिल्याच दिवसापासून महापुराबाबत त्यांनी कामकाज केले. महापुरामध्ये त्यांनी आयुक्त नितीन कापडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली उत्कृष्ठ काम केले. यानंतर आता कोरोनाच्या साथीत सुद्धा त्यांनी उत्कृष्ठ काम केले. आपल्या कारकिर्दीत उपायुक्त म्हणून काम पाहताना राजेंद्र तेली यांनी कोणाचेही मन न दुखवता काम केले. आयुक्त नितीन कापडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त तेली यांनी तत्कालीन महापौर संगीता खोत विद्यमान महापौर गीता सुतार, उपमहापौर आनंदा देवमाने यांच्यासह सर्व नगरसेवक तसेच अधिकारी, कंत्राटदार , नागरिक यांच्याशी समन्वय साधत काम पाहिले. आज  उपायुक्त राजेंद्र तेली हे महापालिकेच्या कामकाजातून निवृत्त झाले आहेत. यानिमित्त त्यांचा महापालिका कॉन्ट्रॅक्टर असोशियन तसेच त्याच्या सहकारी व अधिकारी व  नगरसेवकांनी सत्कार करीत त्यांच्या भावी आयुष्यास शुभेच्छा दिल्या. तर अनेक आव्हानात्मक आणि लोकोपयोगी कामे या महापालिकेत करता आली अशी प्रतिक्रिया राजेंद्र तेली यांनी दिली.