ऑटो पार्ट डीलर असोसिएशन तर्फे आरोग्य तपासणी.
ऑटो पार्ट डीलर असोसिएशन तर्फे आरोग्य तपासणी.


सांगली- सांगली येथील ऑटो पार्ट डीलर असोसिएशन तर्फे,सर्व सभासद व्यापारी आणि त्यांचे कर्मचारी, यांची आरोग्य तपासणी चा उपक्रम, शिबिर आयोजित करण्यात आले होते,सांगलीत प्रथमच असे शिबीर असोसिएशन तर्फे आयोजित झाले,सर्व मालक आणि कर्मचारी अश्या 200 लोकांची शास्त्रशुद्ध अशी आरोग्य तपासणी करण्यात आली, कॅम्प  सांगली येथील GMP फोरम , NIMA सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबीर आयोजीत केले गेले त्याचे  उदघाटन आज रोजी माननीय आयुक्त श्री नितिन कापडणीस व व्यापारी एकता असोसिएशन चे श्री समीर शाह यांच्या उपस्थितीत आज रोजी संपन्न झाले. या अभियानात कोरोना संबंधित  जनरल तपासणी व मार्गदर्शन करण्यात आले. दैनंदिन व्यापारात अनेक लोकांशी संपर्क येतो त्यातून आपण कशी काळजी घ्यायची व सुरक्षित राहायचे याचे ही मार्गदर्शन या अभियाना द्वारे झाले. सारी तसे इतर संसर्गजन्य रोगांचे ही मार्गदर्शन झाले.

हे अभियान यशस्वी होण्या साठी सांगली ऑटो पार्टस चे नलिन शाह ,अमित खत्री , मयूर शाह तसेच डॉ अरुण कोळी , डॉ अनिता पागे, डॉ आनंद पोळ  तसेच डॉ देवपाल बरगले डॉ अभिषेक दिवाण यांनी परिश्रम घेतले.