पावसाळी पाण्याच्या त्रासातून सिव्हिल चौक घेणार मोकळा श्वास



 

 

 

 

 

सांगली  - सांगली महापालिकेने आपल्या पावसाळी उपाययोजनेला सुरवात केली आहे. याचाच एक भाग म्हणून पावसाळी पाण्याच्या त्रासातून सांगलीच्या सिव्हिल हॉस्पिटलचा चौक आता मोकळा श्वास घेणार आहे. आयुक्त नितीन कापडणीस यांच्या नियोजनामुळे सिव्हिल चौकात आता पाणी साचणार नाही.

      सांगली महापालिकेचे आयुक्त नितीन कापडणीस यांनी मागील पुराचा अनुभव लक्षात घेता मुख्य रस्त्यावर साचणारे पाणी तात्काळ निचरा व्हावे आणि रस्ते वाहतुकीस मोकळे व्हावेत यावर विशेष लक्ष दिले आहे. या अंतर्गत सांगलीच्या मुख्य सिव्हिल हॉस्पिटलच्या चौकात सुद्धा महापालिकेकडून पावसाळापूर्व कामाच्या नियोजनाला सुरवात झाली आहे. यामध्ये थोड्याश्या पावसामुळे सिव्हिल चौकात साचून राहणाऱ्या पाण्याचा निचरा हा लगेच करता येणे शक्य आहे. यामध्ये सिव्हिल चौकात पश्चिम आणि पूर्व बाजूला मोठे चेंबर केले जाणार असून या चेंबरमध्ये जमा होऊन ते पाणी एका मोठ्या पाईपच्या साहायाने डॉ आंबेडकर रोडकडे गेलेल्या मोठ्या गटारीमध्ये सोडले जाणार आहे.  यामुळे सिव्हिल चौकात पाणी निचरा करण्याची काहीच सोय नसल्याने जे पाणी साचून राहात होते ते पाणी आता क्षणात निघून जाऊन रस्ता मोकळा होणार आहे. यासाठी आजपासून या कामास सुरवात झाली असून आयुक्त नितीन कापडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली शहर अभियंता एम डी पाटील व शाखा अप्पा अलकुंडे तसेच ठेकेदार कणसे हे कामगिरी करीत आहेत. आठवड्यात हे काम पूर्ण होणार असून कितीही मोठा पाऊस आला तर आता सिव्हिल चौकात पाणी साठणार नाही आणि उलट हे पाणी तातडीने निघून जाणार असल्याने या कामाबाबत नागरिकांनी आयुक्त नितीन कापडणीस यांच्या निर्णयाचे स्वागत केले आहे.