व्यायामशाळा चालू करणेस परवानगी द्यावी - विशाल पाटील.

  • व्यायामशाळा चालू करणेस परवानगी द्यावी - विशाल पाटील.

  • सांगली जिम ओनर्स असोसिएशन यांचे वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन.सांगली – सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिका क्षेत्रातील सर्व व्यायामशाळा (जिम) ह्या प्रथम लॉकडाऊन पासून शासन आदेशानुसार बंद आहेत. त्यामुळे व्यायाम करणारे विद्यार्थी,ट्रेनर,चालक व मालक यांचे प्रचंड नुकसान होत आहे. शासनाच्याअटीस अधिन राहून सर्व व्यायामशाळा चालू करणेस परवानगी द्यावी अशी विनंती वसंतदादा कारखाना चेअरमन विशाल पाटील यांनी जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांना केली. विशालपाटील यांच्या पुढाकाराने सांगली जिम ओनर्स असोसिएशन च्या प्रमुख पदाधिकारी यांनी जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन व्यायामशाळा सुरु करणेबाबत चर्चा केली. केंद्रआणि राज्य सरकारच्या अटीस अधिन राहुन व सर्व नियमांचे पालन करुन व्यायामशाळा सुरु करण्यात याव्यात. व्यायामशाळा बंद असलेमुळे अनेक मालक -चालक हे प्रचंड आर्थिक अडचणीत आले आहेत. अशा अनेक अडचणी व्यक्त करण्यात आल्या.यावेळी सांगली जिम ओनर्स असोशिएशनचे आशुतोष कुलकर्णी, विजयसिंह पाटील, श्रीकांत जयगोंड, वहीद मुलाणी, शब्‍बीर कवठेवाले, इनायत तेरदाळकर उपस्थित होते.