शिराळा येथील नवजीवन वहसातीमध्ये धान्याचे किट वाटप ।

शिराळा दि. १० (वार्ताहर) - कोरोना रोगाचा प्रसार रोखण्याच्या उद्देशाने शासनाने जाहीर केलेले लॉक डाऊनमध्ये आपले कर्तव्य बजावत पोलीस निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेशन विभाग सांगली यांनी जपली सामाजिक बांधीलकी, नवजीवन वसाहत शिराळा येथील नवजीवन वहसातीमध्ये वीस कुटुंबांना जिवनावश्यक किटचे वाटप करण्यात आले. पोलीस निरीक्षक अंतम खाडे, एचसी सनिल चौधरी, मारुती साळ्खे, पोलीस नाईक कुबेर खोत ,सचिन धोत्रे, चेतन महाजन ,सलमान मुलानी,सचिन कनप तसेच सामाजिक कार्यकर्ते कपिल ओसवाल आदींच्या हस्ते किटचे वाटप केले. या वेळी माजी ग्रामपंचायत सदस्य दिनेश हसबनीस, पत्रकार विनायक गायकवाड, प्रितम निकम हे उपस्थित होते. ___ यावेळी खाडे म्हणाले, देशामध्ये पोलीस प्रशासनाचे कर्मचारी आपले कर्तव्य बजावत अतिशय उत्कष्ट कामगिरी माना बजावत आहेत. सध्याची परस्थिती पहाता या संकटाला तोंड देताना हातावर पोट असणारे, मोल मजुरी करणारे गोरगरिब लोक बिकट परिस्थितीत आहेत . लॉकडाऊनच्या काळात अनेकांना मूलभूत व जीवनावश्यक वस्तू मिळत नाहीत, म्हणूनच या लोकांना मदत व्हावी, यासाठी प्रयत्न करत आहेत , पोलीस निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सांगली जिल्ह्यातील आष्टा, शिराळा, इस्लापुर आदी अनेक गावातील गरजूंना हि मदत करुन सामाजिक बांधिलकी जपण्याचा छोटासा प्रयत्न करत आहे.